Asgaon Goa: 'सरकार तडजोड करणार नाही', मुख्यमंत्री आक्रमक तर, लोबो म्हणाल्या, 'हा स्वाभिमानाचा प्रश्न'

ASgaon House Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरणात आगरवाडेकर कुटुंबीयांनी माघार घेतल्यानंतर आमदार दिलायला लोबो आक्रमक झाल्या आहेत.
'सरकार तडजोड करणार नाही', मुख्यमंत्री आक्रमक तर, लोबो म्हणाल्या, 'हा स्वाभिमानाचा प्रश्न'
CM Pramod Sawant MLA Lobo And Vijai Sardesai On Asgaon House DemolitionDainik Gomantak
Published on
Updated on

आसगाव येथील आगरवाडेकर प्रकरणाने गोव्यात राजकीय रंग घेतला असताना यात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. आगरवाडेकर कुटुंबाने याप्रकरणी दाखल तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

स्थानिक आमदार दिलायला लोबो यांनी कुटुंबीयांनी केलेल्या तडजोडीचा हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तर, मुख्यमंत्री सावंत यांनी राज्य सरकार बिलकुल तडजोड करणार नाही. तसेच, दोषींवर कडक कारवाईक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

संशयित दिल्लीतील बिल्डरच्या प्रतिनिधीने आगरवाडेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचे आश्वासन दिले. तसेच, जमिनीच्या मालकीहक्काबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आगरवाडेकर कुटुंबीयांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मुख्यमंत्री व सरकारकडून आम्ही कशाचीच मागणी न केल्याचे त्यांनी म्हटलंय.

यावरुन आता सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते देखील आक्रमक झाले आहेत. शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी आगरवाडेकरांच्या या निर्णयाने धक्का बसल्याचे म्हटले आहे.

गोवा हा अभिमानी लोकांचा समुदाय आहे. आमचा अशाप्रकारे अवमान केला जाऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारने हा खटला लढावा अशी मी मागणी करते. गोवा आणि गोमंतकीयांना हे प्रकरणे कळणे आवश्यक आहे. कोणी आपल्याला गृहित धरु नये, आमचा अभिमान विकू नये, असे लोबो म्हणाल्या.

'सरकार तडजोड करणार नाही', मुख्यमंत्री आक्रमक तर, लोबो म्हणाल्या, 'हा स्वाभिमानाचा प्रश्न'
GST Council: देशातील रिअल इस्टेटला उभारी देण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री अन् अजितदादा करणार एकत्र काम!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याबाबत विचारले असता त्यांनी शंभर टक्के कारवाईची हमी दिली. तसेच, सरकार या प्रकरणात अजिबात तडजोड करणार नाही, असे म्हटले.

पोलिसांची पथके दोषींसाठी शोध घेण्यासाठी मुंबई आणि बेळगावला रवाना झाली आहेत. आगरवाडेकरांनी तडजोड करणे हा त्यांचा निर्णय असल्याचेही सावंत यावेळी म्हणाले.

तर, गोवा फॉरवर्डचे प्रमुख फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी याप्रकरणात हे होणे अपेक्षितचे होते असे म्हटले आहे. उत्तर गोव्यात पुड्यांची संस्कृती आहे. यामुळे परप्रांतीयांना आणखी प्रोत्साहन मिळेल, सरकारने लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com