मतदानाच्या दिवशी राज्यात भाजप समर्थकाच्या गाडीला संशयास्पद आग

अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Goa Bjp Supporter Vallabh Salkar
Goa Bjp Supporter Vallabh Salkar Dainik Gomantak

गोवा: राज्यात आज विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली असून, राज्यात सगळीकडे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांची करडी नजर चुकवून मध्यरात्री भाजप समर्थक वल्लभ साळकर यांच्या गाडीला आग लावण्यात आली आहे. ही घटना बोर्डे-डिचोली (Bicholim) येथे घडली असून, अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bjp supporter's car burnt on election day in goa)

Goa Bjp Supporter Vallabh Salkar
Goa Assembly Election 2022: या उमेदवारांचे नशीब होणार मतपेटीत बंद

फ्लॅटच्या खाली पार्क करण्यात आलेल्या त्या गाडीला आज्ञातांनी आग लावली असून, या आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विधानसभा निवडणुका (Goa Assembly Election) शांततेत पार पाडण्यासाठी, गोव्यातील निवडणूक आयोग (Election Commission) आपली कंबर कसून तयार आहे. पोलिस प्रशासन आपली करडी नजर ठेऊन आहे. तसेच ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या करड्या नजरेला चुकवून राज्यात या प्रकारच्या घटना घडायला सुरवात झाली आहे. डिचोली मतदारसंघामध्ये 9 वाजेपर्यंत 11.4% मतदान पूर्ण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com