Mapusa Crime: म्हापशात 'रोडरेज'वरून पोलिसाला मारहाण; दोघांना अटक, दोघे फरार

Mapusa Crime News: 'रोडरेज'वरून एका पोलिसाला मारहाण करीत, त्याच्या अन्य तिघा मित्रांना शिविगाळ तसेच धमकी दिल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी चौघांवर गुन्हा नोंद केला.
Mapusa Crime News
Mapusa Crime NewsDainik Gomantak

Mapusa Crime News

'रोडरेज'वरून एका पोलिसाला मारहाण करीत, त्याच्या अन्य तिघा मित्रांना शिविगाळ तसेच धमकी दिल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी चौघांवर गुन्हा नोंद केला.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित जोवित कुतिन्हो व एलरिच फर्नांडिस यांना अटक केली, तर संशयित पवन तिरके व राज हे अद्याप फरार आहेत. सर्व संशयित हे हळदोणेचे रहिवासी आहेत. ही घटना बुधवार, १० रोजी उत्तररात्री १.४५ वा. च्या सुमारास म्हापशात घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित पवन तिरके (कारचालक) हा जोवित कुतिन्हो याच्यासोबत स्कोडा कारगाडीतून (जीए ०३ एच ०५६९) मधून म्हापशाहून हळदोणेच्या दिशेने जात होता.

तर, पीडित मल्लेश जोडी (कारचालक) हा जीए ०३ झेड ७१३३ या कारनेआपले मित्र महेश दळवी, तेजस गुरव, शरद भातकांडे यांच्यासोबत मारुती बलेनोमधून जात असता, त्यांच्या गाडीचा छोटासा अपघात वरील संशयितांच्या गाडीसोबत झाला.

हा अपघात अलंकार थिएटरजवळील कळंगुटकर नर्सिंग होमसमोरील रस्त्यावर घडला.

या अपघातानंतर पवन तिरके व मल्लेश जोडी यांच्यात बाचाबाची व झटापट झाली. त्यानंतर संशयित पवन तिरके याने मोबाईल फोनवरून आपल्या इतर मित्रांना घटनास्थळी बोलावले असता, तिथे संशयित राज, एलरिच फर्नांडिस व इतर काहीजण आले.

नंतर चौघांना मिळून पीडित मल्लेश जोडी यास जबर मारहाण करीत धमकी दिली. यात मल्लेशच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.

Mapusa Crime News
NCB Goa: सराईत नायजेरीयन ड्रग्ज तस्कर स्टॅनलीसह त्याच्या पत्नीची 1.06 कोटींची मालमत्ता जप्त

या प्रकारानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पोबारा केला असता, म्हापसा पोलिसांनी

शोधमोहीम राबवत संशयित जोवित कुतिन्हो व एलरिच फर्नांडिस यांना अटक केली. या संशयितांच्या स्कोडा कारला उसकई येथे म्हापसा पोलिस व डिचोली पीसीआर व्हॅनने अडविले.

पोलिसांनी या संशयितांवर भादंसंच्या कलम ५०४, ३२४, ५०६(२), ५०० व ३४ अन्वये गुन्हा नोंद केला. तर इतर दोघे संशयित पवन तिरके व राज हे दोघेही फरार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com