Goa Assembly: वास्कोतील भिकाऱ्यांवर पोलिस कारवाई सुरू; पडताळणीचे निर्देश

Beggars Issue: वास्कोतील भिकाऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे लोकांच्या समस्यांसंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले
Beggars Issue: वास्कोतील भिकाऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे लोकांच्या समस्यांसंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले
Goa Assembly Monsoon Session 2024 | CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वास्कोतील भिकाऱ्यासंदर्भातच्या तक्रारी पोलिस नोंदवून कारवाई करत आहेत. ज्या ठिकाणी भिकारी मुले भीक मागताना आढळून येतील त्यांची पडताळणी करण्याचे निर्देश देतो, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज शून्य तासावेळी विधानसभेत आमदार कृष्णा साळकर यांनी केलेल्या विनंतीवर दिली.

वास्कोतील भिकाऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे लोकांच्या समस्यांसंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. या लोकांच्या मद्यपी वर्तनाची प्रकरणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे यामुळे गैरसोय होत आहे.

तसेच एक संघटित भीक मागण्याच्या रॅकेटच्या संभाव्यतेची वाढती चिंता ज्यामुळे बाल शोषण आणि अपहरण प्रकरणे होऊ शकतात. या समस्या आणखी वाढण्यापूर्वी त्वरित आणि कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी आमदार कृष्णा साळकर यांनी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com