ट्रॅफिक सिग्नलजवळील भिकाऱ्यांना आणि विक्रेत्यांना पोलिसांनी त्वरित हटवावे

गोवाकॅनचे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
beggars and vendors near traffic signals
beggars and vendors near traffic signalsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगावात जिथे जिथे ट्रॅफिक सिग्नल्स आहेत, तिथे भिकारी आणि विक्रेत्यांचा वाहन चालकांना त्रास होत आहे. या संदर्भात उपाययोजनेसाठी गोवाकॅनने दक्षिण गोव्याच्या (South Goa) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असल्याची माहिती गोवाकॅनचे निमंत्रक रोलंड मार्टीन्स यानी आज मडगावात पत्रकारांना दिली.

भिकाऱ्यांना (Beggars) आणि विक्रेत्यांना (Vendor's) तेथून हटविण्यासाठी पोलिसांनी (Police) केलेले प्रयत्न वाया गेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी व उपाय शोधण्यासाठी संबंधितांची बैठत बोलवावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावर तात्पुरता उपाय करुन भागणार नाही तर कायमस्वरुपी उपायांची गरज असल्याचे मार्टीन्स यानी सांगितले.

beggars and vendors near traffic signals
'लुईझिन पाठोपाठ कांदोळकरांचा नंबर'

गोवाकॅनने मडगावमधील फ्लायओव्हरच्या दुरुस्ती कामाचे स्वागत केले आहे. ही आमची पुष्कळ काळापासूनची मागणी होती. मात्र दुरुस्ती केल्यावर फ्लायओव्हरवर मोठमोठाले जाहिरातीचे बोर्ड लावू नये, त्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास होण्याचा संभव आहे, असेही मार्टीन्स यानी सुचविले.

रस्ता दुरुस्तीमुळे वाहतूक रस्त्यांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे वाहतुक नियंत्रण पोलिसांनी नव्याने आंखलेल्या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी बसथांबे निश्चित करावे त्यामुळे प्रवाशांना त्रास होणार नाही असेही मार्टीन्स यानी सुचविले.

गांधी मार्केटमधील टपाल कचेरी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीत हलविण्यात आली आहे. मात्र टपाल कचेरीचे नाव मात्र बदललेले नाही. तिथे जीएमसी टपाल कचेरी असे लिहिलेले आहे. जीएमसी म्हणजे गांधी मार्केट कॉम्पलेक्स पोस्ट ऑफीस असा आहे. मात्र काही लोकांना ते समजत नाही. त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) वाटू लागते त्यामुळे कित्येकांची फसवणूकही झालेली आहे. त्यामुळे टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे नाव बदलावे व तेथे एक तर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी टपाल कचेरी असे नाव देण्याची मागणी गोवाकॅनने केली व त्यानुसार पोस्ट फोरमच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला व त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे ठरले अशी माहिती मार्टीन्स यानी दिली.

तसेच मडगावच्या जुन्या बस स्टॅण्डवर जो चहाचा स्टॉल सुरु करण्यात आला आहे. तो बेकायदेशीर असल्याने तो ताबडतोब बंद करावा अशी मागणीही रोलड मार्टीन यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com