'लुईझिन पाठोपाठ कांदोळकरांचा नंबर'

किरण यांची गच्छंती की राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Kiran Kandolkar
Kiran KandolkarDainik Gomantak

पणजी : मोठ्या गाजावाजासह विधानसभा निवडणुकीत उतरलेले गोवा तृणमूल कॉंग्रेसला आता उतरती कळा येऊ लागली आहे. राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद काढून घेतल्यानंतर आता राज्य कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांचा नंबर लागला आहे.

विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) अपेक्षेप्रमाणे यश मिळवू न शकल्याने केंद्रीय समिती लुईझिन फालेरो यांच्याबरोबर किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांच्यावरती नाराज होते.

Kiran Kandolkar
रेजिनाल्ड यांचा भगवा फेटा मोठा चर्चेचा विषय; हालचालींबाबत उत्सुकता

त्यामुळे या दोघांनाही त्यांच्या पदाचे राजीनामे देण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ते दिले नाहीत म्हणून फालेरो यांच्या बाबत संपूर्ण केंद्रीय समितीच बरखास्त केली आणि नव्या समितीवर त्यांना पदापासून बाजूला ठेवण्यात आले. तर आता कांदोळकर यांच्या बाबतही हाच निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यांना पदावरून पायउतार होण्यास सांगितले आहे. मात्र, ते पद सोडण्यास तयार नसल्याने त्यांची गच्छंती अटळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी केवळ तीन महिने गोव्यात येऊन तृणमूल कॉंग्रेसने (Congress) मोठा गाजावाजा करीत अनेक नेत्यांना आपल्या पक्षात ओढले होते. यासाठी प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’ संस्थेची मदत घेण्यात आली होती. प्रत्यक्ष निवडणुकीत गोव्यातील सर्वात जुन्या मगो पक्षाबरोबर युती करण्यातही तृणमूलने यश मिळवले होते.

मगोबरबर युती करीत विधानसभेच्या 26 जागा तृणमूलने (TMC) लढवल्या होत्या. यापैकी हळदोणा, थिवी, बाणावली, वेळ्ळी, कुंभारजुवे यांसह इतर सर्व जागांवर निर्णायक लढत देऊन पक्षाच्या उमेदवारांना विजयाच्या जवळ नेण्यात पक्ष यशस्वी झाला असला तरी पक्षाला अपेक्षित असलेले यश मिळणार का? याबाबत मात्र साशंकता आहे. त्यामुळे संबंधित जबाबदार व्यक्तींना याबाबत पक्षाकडून विचारणा केली असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने केंद्रीय समिती नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे.

Kiran Kandolkar
'बेकायदेशीर खाण प्रकरणांचे भवितव्य नव्या सरकारवर अवलंबून'

कांदोळकरांची पुढची चाल कोणती?

भाजपमधून आपल्या राजकीय (Politics) कारकिर्दीला सुरवात केलेले किरण कांदोळकर भाजपचे 2012 मध्ये ते भाजपचे आमदार होते. कॉंग्रेसचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर ते भाजपात अस्वस्थ होते. त्यातच 2019 साली आमदार हळर्णकर भाजपात आल्यानंतर या पुन्हा ते अस्वस्थ बनले आणि त्यांनी भाजपाही सोडली. पुढे त्यांनी विजय सरदेसाई यांच्याबरोबर घरोबा करत ‘गोवा फॉरवर्ड’चा झेंडा खांद्यावर घेतला. पण, 2022 मध्ये निवडणुकांच्या तोंडावर आपली पत्नी जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर यांच्यासह तृणमूलची वाट धरली. हळदोणा आणि थिवी मतदारसंघातून पती-पत्नीने निवडणूक लढवली. या निवडणुकीचा (Election) निकाल अद्यापही येणे बाकी असतानाच त्यांना हे पद सोडावे लागत आहे. त्यामुळे आता कांदोळकर पुढची चाल काय खेळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com