DGP jaspal Singh
DGP jaspal SinghDainik Gomantak

Goa पोलिसांची धडक मोहिमेची शक्यता, ड्रग्स डिलरसह रेती माफिया पोलिसांच्या रडारवर

गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना मोकळीक दिली आहे.
Published on

अमली पदार्थांसह वाढत्या गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी आज पोलिस महासंचालकांनी निरीक्षक व त्यावरील पदाच्या अधिकाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीत गुन्हेगारांवर नजर ठेवण्याबरोबरच ड्रग्स व अवैध रेती उपशाविरोधात ठोस कारवाई करण्याचा आदेश महासंचालक जसपाल सिंग यांनी अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, ही बैठक गेल्या आठवड्यात होणार होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अचानक पोलिस मुख्यालयाला भेट देऊन बैठक घेतल्याने नियोजित बैठक होऊ शकली नव्हती. ती आज घेण्यात आली. एकूण गुन्ह्याबाबत गोवा पोलिसांचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. हल्ली घडलेल्या काही घटनांमुळे पोलिसांनी ड्रग्सविरोधात मोहीम उघडली आहे.

DGP jaspal Singh
Breaking News|काँग्रेसला गोव्यात मोठं खिंडार; 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

पोलिस महासंचालक सिंग यांनी अधिकाऱ्यांना बेकायदेशीर गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करण्यास बजावले आहे. ड्रग्स आणि वाळू माफियांवर येत्या काही दिवसांत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करा, असे सक्त आदेशही त्यांनी दिले आहेत. गुंड, हिस्ट्री शीटर्स आणि लोकांची सतावणूक करणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत.

DGP jaspal Singh
Goa Congress Rebel : काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; 'हे' आमदार करणार भाजपप्रवेश

पोलिसांच्या धडक मोहिमेची शक्यता: गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना मोकळीक दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पोलिसांकडून विविध भागांत धडक कारवाईची मोहीम आखली जाण्याची शक्यता आहे. लवकरच पर्यटन हंगाम गोव्यात सुरू होत आहे हे लक्षात घेऊन पोलिसांना सतर्क केले आहे.

DGP jaspal Singh
Goa Congress MLA| अखेर नजिर खान यांचे ते भाकीत खरे ठरले! काँग्रेसच्या आठ आमदार भाजपच्या वाटेवर

NDPS कायद्याचा वापर: राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स येत आहे. त्याच्या विक्रीमध्ये गुंतलेल्यांच्या नाड्या आवळण्यासाठी हल्लीच पीट एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances) कायद्याचा वापर करून तिघांविरुद्ध कारवाई केली आहे. ड्रग्स व्यवसायात गुंतलेल्यांना हे संकेत पुरेसे आहेत. काही ठिकाणी पर्यटकांना सिंथेटिक ड्रग्स पुरवले जाते, अशी माहिती बैठकीत एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com