Goa Job Scam: बेरोजगार तरुणांना गंडा! सरकारी नोकरच झालेत दलाल; फसवणुकीचे एका आठवड्यात चार गुन्हे

Goa Government Job Fraud Cases: सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो रुपये घेऊन ठकसेनांनी फसवणूक केल्याचा पर्दाफाश होताच आठवडाभरात पोलिसांत चार गुन्हे नोंद करून नऊ ठकसेनांचा पर्दाफाश केला आहे.
Goa Job Scam, Goa Government Job, Goa Government Job Scam
Goa Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Fraudsters Promising Government Jobs Arrested After Multiple Complaints in Goa

पणजी: बेरोजगारी तसेच बेभरवशाच्या खासगी कंपन्यांमधील नोकऱ्यांमुळे अनेकजण सरकारी नोकऱ्यांसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम मोजण्यास तयार होऊ लागले आहेत. त्याचाच गैरफायदा काही सरकारी कर्मचारी घेत आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो रुपये घेऊन ठकसेनांनी फसवणूक केल्याचा पर्दाफाश होताच आठवडाभरात पोलिसांत चार गुन्हे नोंद करून नऊ ठकसेनांचा पर्दाफाश केला आहे.

त्यामुळे दलाल बनलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. नोकरीसाठी पैसे देऊन फसविले गेलेले अनेकजण आहेत. मात्र, ते अजूनही सरकारी नोकरी मिळेल, या प्रतीक्षेत आहेत.

सध्या समोर आलेल्या प्रकरणांमध्ये सरकारी नोकऱ्या मिळवून देणारे ठकसेन किंवा दलाल हे सरकारी सेवेतच कामाला आहेत. उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांचे काही पालक लोकप्रतिनिधींना निकट असलेले सरकारी कर्मचारी तसेच कार्यकर्त्यांच्या आमिषाला बळी पडत आहेत.

अनेकांना गंडा घातलेल्या श्रावणी ऊर्फ पूजा नाईक या महिलेला यापूर्वीही नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक झाली होती. तरीही वारंवार लोक तिच्या आमिषाला बळी पडत आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे देऊन फसविले गेलेले तक्रारदार हे फोंडा तालुक्यातील असल्याने या ठकसेनांची या परिसरातील लोकप्रतिनिधींशी जवळीक असावी, अशी चर्चा सुरू आहे.

तक्रारींचा ओघ वाढला

सध्या पोलिस कोठडीत हवा खात असलेल्या पूजा नाईक हिच्याविरोधात पर्वरी, म्हार्दोळ, फोंडा तसेच डिचोली या पोलिस स्थानकांत तक्रारी नोंद झाल्या आहेत. तिला अटक झाल्याने नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतलेल्या पूजा आणि तिच्या साथीदारांविरुद्ध तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. सध्या म्हार्दोळ पोलिसांत नोंद असलेल्या तक्रारींचा तपास सुरू आहे. त्यानंतर इतर पोलिस स्थानकांतील तक्रारींच्या चौकशीसाठी तिला ट्रान्स्फर वॉरंटवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील अनेक महिने तिची सुटका होणे कठीण आहे.

Goa Job Scam, Goa Government Job, Goa Government Job Scam
Mega Projects in Goa: गोव्यात का होतोय 'मेगा प्रोजेक्ट्स'ना विरोध? 'गावपण' गमावण्याची भीती की सरकारी 'यंत्रणेवर' अविश्वास?

ठकसेनांची लोकप्रतिनिधींशी जवळीक

लोलये सरपंचांच्या नातेवाईकालाही तिघा ठकसेनांनी सरकारी नोकरी देण्याचे वचन देऊन लाखो रुपयांना लुबाडले आहे. हे ठकसेन लोकप्रतिनिधींशी जवळीक करून आपली छाप पाडतात आणि गरजूंचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करतात, तरीही अनेकदा त्यांच्याविरुद्ध तक्रारी होताना दिसत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com