Goa Police: गोवा पोलिसांना चकवा, उत्तर प्रदेशातून अटक केलेला आरोपी मुंबई विमानतळावरुन फरार

Goa Police:गोव्याला येणाऱ्या फ्लाईटसाठी टर्मिनल बदलत असताना इमादने संधी साधत पोलिसांच्या हातून निसटत विमानतळावरुन पोबारा केला.
Mumbai Airport
Mumbai AirportDainik Gomantak

Goa Police

म्हापसा पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला गोव्यात घेऊन येत असताना त्याने पोलिसांनी चकवा दिल्याची घटना समोर आली आहे. ३२ वर्षीय आरोपीला म्हापसा पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली होती. विमानाद्वारे त्याला गोव्यात आणले जात असताना मुंबई विमानतळावरून त्याने पोलिसांना चकवा देत पोबारा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिस इमाद वसीम खानला बुधवारी सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन आले. गोव्याला येणाऱ्या फ्लाईटसाठी टर्मिनल बदलत असताना इमादने संधी साधत पोलिसांच्या हातून निसटत विमानतळावरुन पोबारा केला.

गोवा पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी शहर पोलिसांना माहिती देत इमाद विरोधात भारतीय दंड संहिता कलम २२४ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा नोंद केला.

Mumbai Airport
Goa Petrol Diesel Price: मोठी बातमी! गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार वाढ, सरकारने वाढवला व्हॅट

इमाद खान विरोधात म्हापसा पोलिसांत सरकारी अधिकारी असल्याचा बनाव, कैदेत असताना जाणिवपूर्वक दुखापत पोहोचवणे याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.

गोवा पोलिसांनी इमादला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशातील सहारनपूर गाठले. इमादला अटक करुन गोव्याला परत येण्यासाठी पोलिसांनी दिल्लीतून फ्लाईट घेतली. दरम्यान, मुंबईत गोवा फ्लाईटसाठी टर्मिनल बदल असताना इमादने संधी साधत विमानतळावरुन पळ काढला. पोलिसांना इमादला पकडण्यासाठी पाठलाग केला खरा पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com