PM Invites Pope: पोप फ्रान्सिस गोव्यात येणार? पंतप्रधान मोदींनी दिले भारत भेटीचे आमंत्रण

PM Invites Pope: इटलीमध्ये झालेल्या G-7 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली.
PM Modi And Pope Francis
PM Modi And Pope FrancisModi X Handle

PM Invites Pope

इटलीमध्ये झालेल्या G-7 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीत पीएम मोदींनी पोप यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया दिलीय. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून पोप फ्रान्सिस भारत दौऱ्यावर येतील तेव्हा गोव्याला देखील भेट देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पीएम मोदींनी पोप फ्रान्सिस यांच्यासोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केले आहेत.

PM Modi And Pope Francis
Goa Power Tariff Hike: गोमंतकीयांच्या खिशाला झळ बसणार, रविवारपासून वीज दरवाढीचा शॉक

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी लोकांची सेवा करण्याच्या त्यांच्या (पोप फ्रान्सिस) वचनबद्धतेचे कौतुक केले आणि त्यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले. आम्हाला आशा आहे की पोपच्या प्रवास कार्यक्रमात (भारतात) गोवा राज्याच्या भेटीचाही समावेश असेल," अशी एक्स पोस्ट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलीय.

गोवा सरकार पोप फ्रान्सिस यांना सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवशेषांच्या दशवार्षिक प्रदर्शनासाठी जुन्या गोव्यात आमंत्रित करेल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते. या वर्षाच्या अखेरीस त्याचे आयोजन केले जाणार आहे. गोव्यातील एकूण लोकसंख्येपैकी 27 टक्के ख्रिश्चन आहेत.

इटलीमध्ये G-7 परिषदेचे आयोजन

G-7 शिखर परिषद इटलीच्या अपुलिया भागात आयोजन करण्यात आले आहे. G-7 संघटनेच्या सदस्य देशांबद्दल बोलायचे तर त्यात अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान आणि फ्रान्स तसेच युरोपियन युनियनचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com