PM Modi In Goa: पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आढावा घेणार खास सुरक्षा दल

PM Modi In Goa: 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
PM Modi In Goa
PM Modi In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi In Goa On National Games 2023 Inauguration: हमास आणि इस्राईल यांच्यातील युद्धामुळे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोवा भेट निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी केंद्रीय तसेच राज्य सुरक्षा यंत्रणेने कंबर कसली आहे.

गोव्यातील सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रातून खास सुरक्षा दलाचे पथक येत्या दोन दिवसांत गोव्यात दाखल होणार आहे. या विशेष पथकासोबत इंटेलिजन्स विभागाचे पथकही दाखल होणार आहे.

२६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार आहेत. त्यावेळी सुरक्षेचे कोणते उपाय योजणार, त्याचा आढावा हे पथक घेणार आहे. येत्या दोन दिवसांत ही बैठक होण्याची शक्यता आहे.

PM Modi In Goa
National Games Goa 2023: गोव्यातील व्हॉलिबॉलपटूंची निराशा; स्पर्धेत सहभाग नाही, महासंघाच्या अस्थायी समितीने घेतला निर्णय

सुरक्षेचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदी यांना थेट उदघाटनस्थळी उतरविता येणे शक्य आहे का, यावरही विचार होईल. त्यांना हेलिकॉप्टरमधून उदघाटनस्थळी आणण्याचा पर्याय अजूनही खुला आहे, असे या सूत्रांनी सांगितले.

पूर्वीच्या नियोजनानुसार पंतप्रधान दाबोळीला उतरल्यावर त्यांना हेलिकॉप्टरमधून मडगाव येथे आणायचे ठरले होते. यासाठी फातोर्डा स्टेडियमजवळ एक जागा तर आर्लेम मैदानाजवळ दुसरी जगा पाहिली होती.

मात्र, फातोर्डा मैदानावर हेलिकॉप्टर उतरविण्यास वीजतारांची अडचण येत असून आर्लेम मैदानावरून फातोर्डा मैदानावर येणारे रस्ते अरुंद असल्याने ते अडचणीचे ठरले आहेत. या पर्यायावर अजूनही विचार सुरू आहे.

मात्र, हे पर्याय निरूपयोगी ठरले, तर मात्र पंतप्रधानांना गाडीतून मडगाव येथे आणण्यात येणार आहे. तसे झाल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी सहा तास बंद ठेवला जाणार आहे. मात्र, यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com