महाराष्ट्र, गोव्यातील NDA खासदारांशी PM मोदींची खास बैठक, लोकसभा 2024 निवडणुकीसाठी दिला कानमंत्र
PM Modi holds meeting with NDA MP of Maharashtra Goa: लोकसभा निवडणूक-2024 च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या खासदारांसोबत वारंवार बैठका घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोदींनी मंगळवारी महाराष्ट्र आणि गोव्याच्या एनडीएची खासदारांची बैठक घेतली.
पंतप्रधान मोदींनी खासदारांसोबत 1 तासापेक्षा जास्त वेळ संभाषण केले. गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेना खासदार राहुल शेवाळे पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधानांनी बैठकीत महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांसोबत एकत्र येऊन आणि एनडीए आघाडी मजबूत करून पुढे घेऊन जाण्यावर भर दिला. विरोधकांची INDIA युती वैयक्तिक हितसंबंधांसाठी निर्माण केली आहे, तर एनडीएची स्थापना स्थिरता आणि त्याग यावर आधारित असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
एनडीएने नेहमीच उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शिवसेनेच्या मुखपत्र सामनामधून सातत्याने आमच्यावर टीका करण्यात आली, मात्र आम्ही एनडीए किंवा भाजपच्या वतीने काहीही बोललो नाही. एनडीएचा भागीदार या नात्याने आम्ही त्यांना काहीही न बोलता नेहमीच जनतेच्या कामावर आणि लोकांच्या कल्याणासाठी लक्ष केंद्रित केले.
भारताच्या आधुनिक विकासाच्या प्रवासात महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचे राज्य असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. महाराष्ट्र आणि देश समृद्ध करण्यासाठी आपण सर्वजण मेहनत घेऊ. महाराष्ट्रात तिन्ही आघाडीच्या भागीदारांनी एकत्र काम करावे, पुढे जावे हाच प्रयत्न असायला हवा असे पंतप्रधान म्हणाले.
काँग्रेस आघाडी सत्ता काबीज करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती तर एनडीएने त्याग आणि सहिष्णुतेसाठी काम केले. काँग्रेसने नेहमीच स्वतःच्या महत्त्वाला भर दिला आहे, तर एनडीएमध्ये भाजपने आपल्या मित्रपक्षांना संधी दिली आहे. पंजाब असो की बिहार किंवा महाराष्ट्र, आम्ही एनडीएच्या घटक पक्षांना वाढण्याची संधी दिली आहे असेही पीएम मोदी म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.