9 Years of PM Modi: मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाचा चेहरा बदलला : कराड

मोदी सकारची नऊ वर्षे : केंद्राच्या कामगिरीवर टाकला प्रकाश
Bhagwat Karad
Bhagwat KaradDainik Gomantak
Published on
Updated on

9 Years of PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित देश होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत असल्याचे मत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केले.

मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या नऊ वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, कृषीमंत्री रवी नाईक उपस्थित होते.

मंत्री कराड म्हणाले, पूर्वी लस विकसित करणे आणि नंतर ती देण्यास अनेक वर्षे लागायची. पण जेव्हा भारतात कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हा देशाने ही लस विक्रमी वेळेत विकसित झाल्याचे पाहिले. लसीचे 220 कोटी डोस देशातील लोकांना मोफत देण्यात आले.

जर लस परदेशातून विकत घ्यावी लागली असती तर प्रति लस 3 हजार रुपये खर्च आली असता. भारताने टप्प्याटप्प्याने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम हाती घेतली.

विरोधी पक्ष लसीवरच कशी टीका करत होते, याची आठवण कराड यांनी करून दिली. लसीकरणामुळेच देशातील दुसरी आणि तिसरी लाट आटोक्यात येऊ शकते, असे ते म्हणाले.

Bhagwat Karad
Panaji : ‘एमजी कॉमेट इव्ही’चे सादरीकरण

रविवारी उद्‍घाटन झालेल्या संसदीय इमारतीच्या बांधकामात भारताची क्षमता दिसून आली. ते २६ महिन्यांत पूर्ण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

देशभरातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवल्याचे सांगत केंद्र सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध योजनांची कराड यांनी सविस्तर माहिती दिली.

Bhagwat Karad
Goa Petrol-Diesel Price: देशातील विविध राज्यात इंधन दरात बदल, गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे भाव जाणून घ्या

सर्वात लोकप्रिय नेता

कराड पुढे म्हणाले, संपूर्ण भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे उभा आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली  भारताचा  विविध क्षेत्रात विकास होत आहे.

मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीनंतर जगाने भारताच्या क्षमतेवर विश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या गुणांमुळे ‘जगातील सर्वात लोकप्रिय नेता’ म्हणून ओळखले जाते असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com