Khandola News : ‘वारसा’ उपक्रमातून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध : डॉ. फळदेसाई

Khandola News : माशेल सम्राट क्लबतर्फे संगीत महोत्सव उत्साहात
Khandola
KhandolaDainik Gomantak

Khandola News :

खांडोळा, माशेल येथील देवकीकृष्णाच्या पवित्र देवभूमीतील कलाकारांनी संपूर्ण विश्वात माशेल गावाचा नावलौकिक वाढविला आहे.

पं. तुळशीदास नावेलकर, गायिका प्रचला आमोणकरसारख्या प्रख्यात कलाकारांची सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या गुडबुकमध्ये नोंद झाली आहे. सम्राट क्लब ‘वारसा’ उपक्रमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करत असल्याचे प्रतिपादन गोवा कला अकादमीचे माजी सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी केले.

माशेल येथील कदंब महामंडळाच्या सभागृहात आयोजित माशेल सम्राट क्लब इंटरनॅशनल संलग्न क्लबतर्फे सम्राट २५ व्या वारसा गायन वादन व नृत्य कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Khandola
Goa CM Pramod Sawant: कर्नाटकात लय जबरा फसले सीएम सावंत; अचानक हॉटेलची लिफ्ट बंद झाल्यानं उडाली भांबेरी

यावेळी सन्माननीय अतिथी सम्राट क्लब इंटरनॅशनल वनचे अध्यक्ष सम्राट अवीन नाईक, विशेष आमंत्रित सम्राट शैलेश बोरकर, गटाध्यक्ष सम्राट इंटरनॅशनल अॅड. रामकृष्णनाईक, खास आमंत्रित निलेश नाईक, गोविंद भगत, सम्राट क्लब माशेलचे अध्यक्ष मनोज कारापूरकर, रोहन घाडी, प्रतिभा गावकर, कार्यक्रम संयोजक गायिका प्रचला आमोणकर, पं. तुळशीदास नावेलकर व्यासपीठावर उपस्थित होते.

शुभ्रा हिने गायिलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ. पांडुरंग फळदेसाई व इतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. सुरुवातीला मनोज कारापूरकर यांनी सम्राट क्लबच्या कार्याची माहिती दिली.

प्रचला आमोणकर म्हणाल्या, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वारसा कार्यक्रम सम्राटतर्फे सुरू करण्यात आला. त्यामुले अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले. कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभल्यामुळे आज पंचविसावा कार्यक्रम साजरा झाला.

कलाकारांची भूमी

तुळशीदास नावेलकर म्हणाले, माशेल ही भूमी देवकीकृष्णाची देवभूमी असून कलाकारांचीही भूमी आहे. येथील मुले कलेच्या सानिध्यात वाढतात. आज या भूमीने अनेक कलाकार, विद्वान घडविले आहेत आणि त्यांची किर्ती संपूर्ण विश्वात आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वेश फुलारी, मंगेश गावकर व अन्य सदस्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com