Plaster of Paris Ganesh Idol
Plaster of Paris Ganesh Idol Dainik Gomantak

गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती स्कॅनरखाली

विक्रेत्यांवर कारवाई : गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती
Published on

पणजी : राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती विक्रीवर बंदी घातली, असली तरी देखील मोठ्या प्रमाणात शेजारच्या राज्यातून त्या आणल्या जात आहे. परंतु कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात कारवाई करता आली नसल्याची माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.

Plaster of Paris Ganesh Idol
Goa Zuari Car Accident : झुआरी कार दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

2020 पासून देशासह राज्यातही कोरोना महामारी सुरू झाली होती. त्यामुळे आम्हाला छापे मारून तपासणी करता आली नाही. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने मंडळाचे निरीक्षक कारवाई करणार आहेत. कला आणि संस्कृती खात्यात नोंद केलेल्या गणपती मूर्तिकारांच्या चित्रशाळेत जाऊन ते पीओपी मूर्ती विक्रीबाबत तपास करणार आहेत.

मूर्ती विक्री करणाऱ्या चित्रशाळांमध्ये जाऊन देखील तपासणी केली जाईल. पीओपी मूर्तीवर सध्या राज्यात बंदी असून, त्या विक्री करण्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच, यासाठी तुरुंगवाससुद्धा आहे, अशी माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com