Margao Market: एसजीपीडीए मार्केटात सुधारणा घडविणार; दाजी साळकर

दाजी साळकर : स्‍वच्‍छतेला देण्‍यात येतेय प्राधान्‍य
Margao  SGPDA Market
Margao SGPDA MarketDainik Gomantak
Published on
Updated on

एसजीपीडीएच्या होलसेल व रिटेल मार्केटमध्ये कायापालट होत आहे. सुमारे लाख ते सव्वालाख रूपये खर्च करून नाले स्वच्छ करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील दहा वर्षांत पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या उद्‌भवणार नाही, अशी माहिती एसजीपीडीएचे चेअरमन आमदार दाजी साळकर यांनी दिली.

Margao  SGPDA Market
Margao Railway Station: मडगाव कोकण रेल्वेस्थानकाचा होतोय कायापालट...

पुढील आठवड्यात नाल्‍यांची आणखी स्वच्छता केली जाईल. काही दिवसांपूर्वी मासळी व भाजीमार्केटमध्ये कचरा टाकण्यासाठी मोठ्या कचरापेट्या देण्‍यात आल्‍या आहेत. त्याचा वापरही विक्रेते करीत आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये आता स्वच्छता दिसू लागली आहे.

मासळी स्वच्छ करण्याची जागाही साफ करण्यात आली आहे. तेथील नाल्‍याची स्वच्छता करण्यात आलीय. जर मासेविक्रेत्यांनी सोपो शुल्क वाढविण्यास संमती दिली तर तेथील फुटलेल्‍या टाईल्स बदलणे, लोखंडी दरवाजे दुरुस्त करणे आदी कामे हातात घेतली जातील.

Margao  SGPDA Market
Sonsodo Garbage Issue: सोनसडोचे ‘ग्रहण’ आता तरी सुटणार?

पुढील आठवड्यात मासेविक्रेत्यांची बैठक बोलावून त्यांची मते जाणून घेतली जातील, असे साळकर म्‍हणाले. या समस्‍येवर तोडगा काढण्‍यासाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचे सहकार्य महत्वाचे आहे. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची भूमिकाही महत्वपूर्ण असल्याचे साळकर म्हणाले.

कंत्राटदाराच्‍या नियुक्तीसाठी पुढील आठवड्यात निविदा

घाऊक मासळी मार्केटमध्‍ये सोपो शुल्क गोळा करणाऱ्या कंत्राटदारांची नियुक्त करण्यासाठी निविदा जाहीर करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात त्यासाठी निविदा काढल्या जातील व जो जास्तीत जास्त बोली लावेल त्याला हे कंत्राट दिले जाईल. त्यामुळे कित्येक दिवसांपासून सुरू असलेला वादही संपेल, अशी अपेक्षा साळकर यांनी व्‍यक्त केली. घाऊक मासळी मार्केटबाहेरील रस्त्याची दुसरी बाजू एसजीपीडीएच्या मालकीची नाही. त्यामुळे तिथे काय होतेय, त्यास आम्ही जबाबदार कसे? असा प्रश्‍‍नही त्‍यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com