Harvalem News: हरवळे बनणार ‘नीम व्हिलेज’; मुख्यमंत्री सावंत

Neem Village: कडुनिंबाची झाडे लावून गावाला ‘नीम व्हिलेज’ बनवण्याचा संकल्प साखळी मतदारसंघातील हरवळे पंचायतीने केला आहे
Neem Village:  कडुनिंबाची झाडे लावून गावाला ‘नीम व्हिलेज’ बनवण्याचा संकल्प साखळी मतदारसंघातील हरवळे पंचायतीने केला आहे
Harvalem Neem Village CM Pramod SawantDainik Gomantak

हरवळे हा गाव यापूर्वी धबधब्यांसाठी प्रसिद्ध होता. मात्र, भविष्यात हरवळे गाव ‘नीम व्हिलेज’ म्हणून नावारूपास आणण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

संपूर्ण पंचायत क्षेत्रात कडुनिंबाची झाडे लावून हरवळे या गावाला भविष्यात ‘नीम व्हिलेज’ बनवण्याचा संकल्प साखळी मतदारसंघातील हरवळे पंचायतीने केला आहे. त्याच अनुषंगाने गेल्यावर्षी पंचायत क्षेत्रात कडुनिंबाची रोपे लावण्यात आली होती.

याही वर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कडुनिंबाचे रोपटे लावून या संकल्पनेला सुरवात केली. यावेळी हरवळेचे सरपंच अंकुश मळीक, उपसरपंच ममता दिवकर, पंचसदस्य संजय नाईक, राजू मळीक, नंदिनी गावस, सचिव नाईक व लुपीन फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित होते.

आपला गाव हा आपली संपत्ती आहे. तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी तसेच आपल्या पुढील पिढीसाठी आपला गाव कशाप्रकारे सुरक्षित व शाबूत राहणार याकडे प्रत्येक नागरिकाने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी गावात झाडे लावतानाच गाव कचरा व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पावले उचलावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

लुपीन फाउंडेशनचे सहकार्य

लुपीन फाउंडेशन या कंपनीच्या साहाय्याने हरवळेत सर्वत्र रस्त्याच्या बाजूला कडुलिंबाची रोपटी लावण्यात येत आहेत. कडुलिंबाच्या झाडांना मोठे महत्त्व आहे, असे यावेळी पंचसदस्य संजय नाईक यांनी सांगितले.

Neem Village:  कडुनिंबाची झाडे लावून गावाला ‘नीम व्हिलेज’ बनवण्याचा संकल्प साखळी मतदारसंघातील हरवळे पंचायतीने केला आहे
Green Tax Act: शेकडो कोटींचा हरित कर वसूल करण्यात हलगर्जी!

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आपला गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे आपल्यावरच आहे. गावातील रस्त्यांवर कचरा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मातृवन’ या योजनेनुसार ‘एक पेड मॉं के नाम’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हरवळेत ‘ज्येष्ठ नागरिकांच्या नावे एक झाड’ ही संकल्पना उल्लेखनीय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com