'पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील प्रदुषणकारी उद्योगावर कारवाई करणार'

राज्याचे आरोग्यमंत्री तथा उद्योग मंत्री विश्वजीत राणे (Minister Vishwajeet Rane) यांनी पिसुर्ले पंचायत (Pissurlem Panchayat) सभागृहात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना दिले.
Minister Vishwajeet Rane
Minister Vishwajeet RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: येथिल पंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या औद्योगिक वसाहती मधील काही कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदुषणामुळे सर्व सामान्य माणूस हैराण होतानाच पर्यावरणाला बाधा निर्माण झाली आहे, या संदर्भात बऱ्याच तक्रारी आपल्या कडे आल्या आहेत, त्यामुळे सदर कंपनीन्याने प्रदुषणावर निर्बंध न आणल्यास कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री तथा उद्योग मंत्री विश्वजीत राणे (Minister Vishwajeet Rane) यांनी पिसुर्ले पंचायत (Pissurlem Panchayat) सभागृहात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना दिले.

यावेळी मंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले की, की पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील नागरिकांना खाण बंदीमुळे जास्त फटका बसला आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढली असताना कंपन्यांच्या वतीने सामाजिक विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांही बंद केल्या आहेत. याची दखल घेऊन येणाऱ्या काही दिवसात पिसुर्ले पंचायत क्षेत्रात रोजगार भरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याच बरोबर या गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर उपाय काढण्याची योजना अंमलात आणून भिरोंडा येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे, परंतू सदर काम कोव्हीड 19 मुळे रखडले आहे, परंतू येणाऱ्या काळात त्या कामाला चालना देण्यात येणार आहे.

Minister Vishwajeet Rane
"पेडणे मतदारसंघात अमली पदार्थ विकणारा उमेदवार मोकाट"

प्रदुषणकारी उद्योगावर कारवाई करणार

पिसुर्ले येथिल औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या काही कंपन्या कडून प्रदुषण होत असल्याचे दिसून आले आहे, त्याच प्रमाणे या वसाहतीचा परीसर रासायनिक विभाग (झोन) म्हणून जाहीर केलेला आहे, त्यामुळे काही उद्योगावर कारवाई करताना अडथळा होत आहे, याची दखल घेऊन आपण वरीष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून हा विषय सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

माजी सरपंच व विद्यमान पंच देवानंद परब

पिसुर्ले पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच देवानंद परब यांनी प्रास्ताविक व स्वागत करून पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाण बंदी मुळे उद्भवलेल्या अडचणींची माहिती देऊन बेरोजगारी वाढली असल्याचे सांगितले, त्यामुळे यावेळी होणाऱ्या रोजगार भरतीत आरोग्यमंत्र्यांनी पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिण्याची विनंती केली, त्याच प्रमाणे काही खाण कंपन्यांनी पाणी देण्याची व्यवस्था बंद केली असल्याचे सांगितले, त्यामुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले. त्याच बरोबर येथिल औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या काही कंपन्यांमुळे प्रदुषण होत आहे, त्यामध्ये टायर इंडिया या कंपनीचा समावेश असल्याचे यावेळी पंच देवानंद परब यांनी नमूद करून सदर कंपन्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.

Minister Vishwajeet Rane
Goa: हरमल येथे एका रेस्टॉरंट छापा टाकून अमली पदार्थ जप्त

जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर

पर्ये मतदार संघात येणाऱ्या पिसुर्ले पंचायतीचा विकास विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या मुळेच झाला आहे, त्यामुळे निवडणूका जवळ पोचताच बरेच पक्ष व उमेदवार प्रकट होतात व निवडणूका झाल्या नंतर गायब होतात, असल्या लोकांवर विश्वास न ठेवता सार्वजनिक आणि मनुष्य विकास यांच्या वर भर देऊन आजपर्यंत आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर केले.

Minister Vishwajeet Rane
Goa Politics: अंमली पदार्थ विकणारे निवडणुकीचे उमेदवार झालेत !

सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे

यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या खास मर्जीतील विनोद शिंदे यांनी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी गेल्या 20 वर्षांपासून स्वखर्चाने केलेल्या कामाचा आढावा घेऊन आरोग्य मंत्र्यांनी कोव्हीड 19 माहामारीच्या काळात सुद्धा जीवाची पर्वा न करता नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी केलेल्या कामाची माहिती दिली, त्याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्तरी तालुक्यात तसेच उजगाव भागात आलेल्या पुरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत तसेच इतर सुविधा देण्यात आल्याची माहिती देऊन इतर कोणावरही विश्वास न ठेवता आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना साथ द्यावी असे शेवटी सांगितले.

या सभेच्या व्यासपीठावर आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या सोबत जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, पिसुर्ले सरपंच जयश्री परब, उपसरपंच रोहीदास राणे, पंच संगिता मोटे, देवानंद परब, रूपेश गावडे, लक्ष्मण गावडे, हिरबाराव राणे, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, माजी सरपंच दिपाजी राणे, सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेचे सुत्रसंचलन अशोक नाईक यांनी केले तर, पंच हिरबाराव राणे यांनी आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com