Pilgao: पिळगाव ग्रामस्थ आक्रमक! 'वेदांता'ची वाहतूक रोखली; खनिज गाळामुळे धोका वाढल्याचे आरोप

Pilgao News: पिळगाव भागातील शेतीत सध्या मातीमिश्रित पाणी घुसत असून, हे ‘लाल’ पाणी खनीजगाळ मिश्रित आहे. तेथील खाणीवरून पसरलेल्या या गाळामुळे रस्त्यांवरही चिखलाची दलदल निर्माण झाली आहे.
Pilgao Protest
Pilgao Latest NewsDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पावसाच्या पाण्याबरोबर खनिज गाळ शेतात घुसत असल्याचा दावा करून पिळगाव पंचायतीसह स्थानिक लोक सोमवारी अचानक रस्त्यावर उतरले. आक्रमक ग्रामस्थांनी सोमवारी दिवसभर ‘वेदांता’ खाणीवरील खनिज वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात पिळगाव पंचायतीच्या सरपंचांसह अन्य पंचसदस्य तसेच कोमुनिदादचे पदाधिकारी आणि स्थानिक लोक सहभागी झाले.

कंपनीला जनतेच्या हिताची काळजी असून त्यासाठी कंपनीतर्फे आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. पर्यावरण आणि सुरक्षेला अनुसरून नियमांचे पालन करूनच खनिज व्यवसाय सुरू आहे, असा दावा ‘वेदांता’च्या प्रवक्त्यांनी केला आहे.

गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची समस्या निर्माण झाली असल्याचे कळते. दुसऱ्या बाजूने याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी येत्या बुधवारी (ता. २०) डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांसह बैठक होणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.

पिळगाव भागातील शेतीत सध्या मातीमिश्रित पाणी घुसत असून, हे ‘लाल’ पाणी खनीजगाळ मिश्रित आहे. तेथील खाणीवरून पसरलेल्या या गाळामुळे रस्त्यांवरही चिखलाची दलदल निर्माण झाली आहे. जोरदार पाऊस पडला की, पाण्याच्या प्रवाहाबरोबर खनिज गाळ रस्त्यांवर तसेच शेतात घुसत आहे. त्यामुळे पिके धोक्यात आले असून, रस्ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत.

Pilgao Protest
Pilgao: 'आई मी परत येतो' म्हणाला, पण परतलाच नाही! शिरगाव दुर्घटनेत पिळगावच्या तरुणाचा मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

पिळगाव येथील कालवाही सध्या मातीमिश्रित पाण्याने तुडुंब भरलेला आहे, असा स्थानिक लोकांचा दावा आहे. याप्रकरणी संबंधित प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष घालत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर उतरणे भाग पडले आहे. असे सरपंच सौ. वालावलकर यांचे म्हणणे आहे. तर अनियंत्रित खनिज व्यवसायावर प्रशासनाचे अजिबात नियंत्रण नाही, असे कोमुनिदादचे अध्यक्ष ॲड. अजय प्रभूगावकर यांनी सांगितले.

Pilgao Protest
Pilgao Mining: ‘वेदांता’ची खनिज वाहतूक सुरळीत! प्रस्ताव अमान्य, पिळगावातील शेतकऱ्यांना फेरविचार करण्याचा सल्ला

मामलेदारांकडून पाहणी

डिचोलीचे संयुक्त मामलेदार नितीन धावसकर यांनी सोमवारी सायंकाळी पिळगाव येथे जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. पिळगावच्या सरपंच शर्मिला वालावलकर, पंचसदस्य मोहिनी जल्मी, उज्वला बेतकेकर, चेतन खोडगीणकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलिसही तैनात होते. संयुक्त मामलेदारांनी सरपंचांसह अन्य पंचसदस्य आणि उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करुन याप्रश्नी उपाय काढण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com