Goa Mining: खनिज वाहतुकीचा 'गुंता' सुटणार कधी? शेतकऱी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकीवरून डिचोलीत निर्माण झालेला ''गुंता'' अद्याप सुटलेला नसून, अजूनही ‘वेदांता’ची खनिज वाहतूक बंदच आहे. या गुंत्याप्रश्नी तोडगा निघून हा वाद कधी मिटणार. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Pilgao Mining Dispute
Vedanta Mining TruckDainik Gomantak
Published on
Updated on

Pilgao Farmers Protest Vedanta Mining Dispute Bicholim

डिचोली: खनिज वाहतुकीवरून डिचोलीत निर्माण झालेला ''गुंता'' अद्याप सुटलेला नसून, अजूनही ‘वेदांता’ची खनिज वाहतूक बंदच आहे. या गुंत्याप्रश्नी तोडगा निघून हा वाद कधी मिटणार. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पिळगाव-बागवाड्यावरील शेतकऱ्यांनी आज (सोमवारी) डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देऊन पर्यायी रस्त्याला विरोध दर्शवला.

पिळगावची सरपंच मोहिनी जल्मी आणि पंचसदस्य उज्वला बेतकेकर यांच्या नेतृत्वाखाली बागवाड्यावरील महिला मिळून शेतकऱ्यांनी आज सकाळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी कासकर यांची भेट घेतली. या शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यां समोर आपले म्हणणे मांडले. वेदांता खाणीवरील खनिज वाहतुकीचा रस्ता शेतकऱ्यांनी अडवला असून, पर्यायी रस्त्यानेही खनिज वाहतूक करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे गेल्या तेरा दिवसांपासून खनिज वाहतूक बंद आहे. शेती नष्ट करणारी खनिज वाहतूक आम्हाला नको आहे, अशी भूमिका सरपंच सौ. जल्मी आणि पंचसदस्य उज्वला बेतकेकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी घेतली आहे.

गेल्या शनिवारी (ता. ३०) शेतकऱ्यांसह ‘वेदांता’च्या कामगारांनी स्वतंत्रपणे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांची भेट घेवून आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली आहे. प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहणार, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर भवितव्याचा विचार करुन खाण व्यवसाय सुरळीतपणे सुरु करा. अशी मागणी ‘वेदांता’च्या शेतकऱ्यांनी केली आहे. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या प्रश्नी ‘सुवर्णमध्य’ काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

Pilgao Mining Dispute
Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ मान्‍यतेवरुन विशेष ग्रामसभेची जोरदार मागणी; प्रसंगी घुसून महोत्‍सव बंद करु, आमदार आर्लेकरांचा इशारा

मुख्यमंत्र्यांना भेटणार

पर्यायी रस्त्याला विरोध करणारे निवेदन शेतकऱ्यांनी खाण आणि भूगर्भ खात्यासह पोलिसांना दिले आहे. याप्रश्नी आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले आहे. उद्या किंवा परवापर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com