
Pilgao Sarpanch Sharmila Valavalkar
डिचोली: पिळगावच्या सरपंचपदाची माळ अखेर अपेक्षेप्रमाणे शर्मिला वालावलकर यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली.
मोहिनी जल्मी यांच्या विरोधातील अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. नवीन सरपंच निवडण्यासाठी शुक्रवारी बोलाविण्यात आलेल्या बैठकीस मावळत्या सरपंच मोहिनी जल्मी यांच्यासह सुनील वायंगणकर, उमाकांत परब गावकर, चेतन खोडगिणकर, स्वप्नील फडते, उज्ज्वला बेतकीकर आणि शर्मिला वालावलकर उपस्थित होते. या पदासाठी शर्मिला वालावलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निरिक्षक डिचोली गट विकास कार्यालयातील अधिकारी नवनाथ आमरे यांनी जाहीर केले.
पिळगावात सध्या खनिज प्रश्न तापलेला आहे. यासंबंधी विचारले असता खनिजप्रश्नी मी गावाबरोबर राहीन, असे नवनिर्वाचित सरपंच शर्मिला वालावलकर यांनी सांगितले. आमदार प्रेमेंद्र शेट तसेच सहकारी पंचांच्या सहकार्याने पंचायतीचा विकास पुढे नेण्यासाठी मी कार्यरत राहणार, असेही वालावलकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.