Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

Pilgao Mining Protest: शेतकऱ्यांनी सारमानस येथे सेसा कंपनीच्या फाटकाजवळ रस्ता अडवल्याने खनिज वाहतुकीस अडथळा झाला. त्यामुळे वाहतूक बंद ठेवावी लागली. परिणामी प्रतीक्षेनंतर खनिज ट्रक माघारी फिरले.
Pilgao Mining
Pilgao MiningDainik Gomatnak
Published on
Updated on

डिचोली: प्रलंबित नुकसान भरपाईसह अन्य प्रश्न सोडवा, अशी मागणी करीत सारमानस-पिळगावमधील शेतकरी अचानक रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी सारमानस येथे सेसा कंपनीच्या फाटकाजवळ रस्ता अडवल्याने खनिज वाहतुकीस अडथळा झाला. त्यामुळे वाहतूक बंद ठेवावी लागली. परिणामी प्रतीक्षेनंतर खनिज ट्रक माघारी फिरले.

मात्र, स्थानिक सरपंचांसह एकही पंच आंदोलनस्थळी फिरकला नाही. धूळ व ध्वनी प्रदूषणाचा त्रास आम्ही सोसत आहोत. उलट प्रलंबित प्रश्न आणि आमच्या मागण्यांकडे सरकारचेही लक्ष नाही, अशी कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. मागण्या मान्य होत नाहीत.

तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. त्यासाठी आंदोलनस्थळी पोलिस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्या (शुक्रवारी) सकाळी १०.३० वा. उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत एक संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीस शेतकऱ्यांसह कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संघर्ष चालूच राहणार!

आम्हाला न्याय मिळावा, यासाठी गेल्या जवळपास १९ महिन्यांपासून आमचा संघर्ष सुरु आहे. सरकारी पातळीवर बैठका झाल्या, मात्र आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक तोडगा निघालेला नाही. आता आम्ही माघार घेणार नाही. प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार. असे एक शेतकरी सुधाकर वायंगणकर यांनी सांगितले. खाण कंपनीसह सरकारकडूनही पिळगावमधील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. असा दावा सामाजिक कार्यकर्ते ऍड. अजय प्रभूगावकर यांनी करुन आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. असे त्यांनी स्पष्ट केले.

Pilgao Mining
Paira Mayem Mining: "स्थानिकांना खाणीवर काम द्या"! संतप्त लोकांनी पैरात खनिज वाहतूक रोखली; ट्रकांवरून बाचाबाची Watch Video

ट्रकवाले अडचणीत

खनिज वाहतूक बंद ठेवावी लागल्याने ट्रकवाले नाराज झाले आहेत. कर्ज काढून खनिज वाहतुकीसाठी ट्रक रस्त्यावर उतरविले आहेत. मात्र अधूनमधून ट्रक बंद ठेवावे लागत असल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत येत आहोत. ट्रकचालक आदी आमच्यावर अवलंबून असलेल्या घटकांवरही परिणाम होत आहे. सरकारने याप्रश्‍नी लक्ष घालून ट्रकवाल्यांचे दुखणे दूर करावे, अशी मागणी डिचोली तालुका ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष तुळशीदास चोडणकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Pilgao Mining
Pilgao Mining: 'धडधडीमुळे झोप लागत नाही'! खाणवाहतुकीविरुद्ध ग्रामस्थ संतप्त; रस्त्यावर उतरून अडवले ट्रक Watch Video

ग्रामस्थांच्या हिताला प्राधान्य!

पिळगाव येथील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या हिताला कंपनी प्राधान्य देते. सरकारी नियमानुसार दिलेली भरपाई अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहे, असे स्पष्टीकरण वेदांता सेसा कंपनीकडून देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांनी भरपाईसाठी सोपस्कारांसाठी पुढे यावे, असे आवाहनही कंपनीने केले आहे. रोजगाराबाबत गोमंतकीयांचा प्रामुख्याने विचार होतो, सर्व घटकांच्या सहभागातून ‘सस्टेनेबल मायनिंग’वर भर आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com