Goa Petrol Diesel Price: गोव्यातील इंधनाचे ताजे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे भाव

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
Goa Petrol Diesel Price 17th September
Goa Petrol Diesel Price 17th SeptemberDainik Gomantak

Goa Petrol Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडू लागल्या आहेत. सोमवारी (दि.18) सकाळी क्रूड ऑईलचा भाव 94 डॉलरच्या पुढे गेला. दरम्यान, आज सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमतीत आज वाढ झाली असून, दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये तेलाच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर तर, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 90.29

Goa Petrol Diesel Price 17th September
Goa Accident: ऐन सणासुदीच्या तोंडावर अपघातांचे सत्र, रविवार ठरला घातवार; चार अपघातात 15 जखमी, एक ठार

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com