Court
CourtDainik Gomantak

Tiger Anwar Case: व्हेली डिकॉस्ताचा न्यायालयाने नाकारला जामीन

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट सिल्वा (Vincent Silva) यांनी फेटाळून लावला.
Published on

मडगाव: खतरनाक गुंड टायगर अन्वर (Tiger Anwar) याच्यावर झालेल्या खुनी हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी व्हेली डिकॉस्ता (Wally DiCosta) याने जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट सिल्वा (Vincent Silva) यांनी फेटाळून लावला.

या प्रकरणात जो प्रथमदर्शनी पुरावा पुढे आला आहे तो पाहता व्हेली डिकॉस्ता आणि अन्वर यांच्यात पूर्ववैमनस्य होते. ज्या दिवशी हा हल्ला झाला त्यादिवशी व्हेलीने अन्वरवर गोळीबार केल्याचा प्रथम दर्शनी पुरावा पुढे आला आहे. याशिवाय आरोपीची पार्श्वभूमी गुंडगिरीची असल्याने त्याला जामीन मिळाल्यास तो जामीन हुकवून पळून जाऊ शकतो असे नमूद करीत न्या. डिसिल्वा यांनी हा अर्ज फेटाळून लावला.

Court
Goa: बलात्कार प्रकरणातील संशयितला उत्तरप्रदेशहून अटक
Wally DiCosta
Wally DiCostaDainik Gomantak

16 फेब्रुवारी 2021 रोजी आर्लेम सर्कलजवळ हा खुनी हल्ला झाला होता. गुंड अन्वरचा हातात धारदार कोयता घेऊन पाठलाग करताना पोलिसानी अटक केली होती. अन्वरचा त्यावेळी अन्य संशयित पाठलाग करत होते. पोलिसांच्या दाव्याप्रमाणे त्यात व्हेलीचाही समावेश होता. आणि व्हेलीनेच त्याच्यावर गोळीबार केला होता.

Court
Goa: म्हादई व रगाडा नदी तुफान; वाळपई फोंडा मार्ग बंद

यावेळी व्हेलीच्या वतीने बाजू मांडताना त्याच्या वकिलाने या प्रकरणात अन्य सहा संशयितांना जामीन मिळाला आहे असे न्यायालयाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही गुन्हयात संबंधित संशयिताने कशा प्रकारचा गुन्हा केला आहे आणि त्याची पार्श्वभूमी कशी आहे यावर जामीन द्यावा की नाही हे ठरवायचे असते. इतरांना जामीन मिळाला म्हणून गंभीर गुन्हा केलेल्यालाही तो मिळू शकत नाही असे न्या. डिसिल्वा यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com