मोरजी, शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पेडणे तालुक्यातील एकूण ३२ पैकी १५ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.
त्यात हरमल पंचक्रोशी, लोकशिक्षण हायस्कूल धारगळ, श्री कमळेश्वर हायस्कूल कोरगाव, मांगिरीश विद्यालय आरोबा, प्रज्ञा हायस्कूल कोरगाव, सरकारी हायस्कूल वझरी, डॉन बॉस्को हायस्कूल तुये, श्री सातेरी विद्यामंदिर इब्रामपूर, हळर्ण पंचक्रोशी हायस्कूल, सरकारी हायस्कूल दाडाचीवाडी, सरकारी हायस्कूल हणखणे, विकास हायस्कूल विर्नोडा, साई विद्यामंदिर तोरसे, सेंट ॲनी हायस्कूल इब्रामपूर व ज्ञानदीप अकादमी कासारवर्णे यांचा समावेश आहे.
पेडणे येथील व्हायकाऊंट हायस्कूलमधील ६८ पैकी ६७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.५३ टक्के लागला. हरमल पंचक्रोशी हायस्कूलमधील ७६ विद्यार्थ्यांपैकी ७६ विद्यार्थी पास होऊन १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. पेडणे श्री भगवती हायस्कूलमधून ५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ४५ विद्यार्थी पास होऊन निकाल ७८.९५ टक्के लागला. लोकशिक्षण हायस्कूलमध्ये एकूण १७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १७ उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला.
श्री कमळेश्वर हायस्कूल कोरगाव : २० विद्यार्थ्यांपैकी २० उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल. चांदेल हुतात्मा बापू गवस मेमोरियल हायस्कूल : २३ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९५.६५ टक्के निकाल. मांगिरीश विद्यालय आरोबा : एकूण १३ पैकी १३ विद्यार्थी पास होऊन निकाल १०० टक्के. प्रज्ञा हायस्कूल कोरगाव : २२ पैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के. रमाकांत खलप मांद्रे हायस्कूल : २२ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९५.४५ टक्के.
पार्से दुर्गा हायस्कूल : १५ पैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ६६.६७ टक्के. सरकारी हायस्कूल वझरी : १० पैकी १० विद्यार्थी उर्त्तीण होऊन निकाल १०० टक्के. डॉन बॉस्को हायस्कूल तुये : ६४ पैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के. सातेरी विद्यामंदिर इब्रामपूर : २० पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल शंभर टक्के. हरमल पंचक्रोशी हायस्कूल : १० पैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के.
आयडियल हायस्कूल पालये : १६ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ६८.७५ टक्के. अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल हरमल : ५६ पैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९४.६४ टक्के. पीटर आल्वारीस मेमोरियल हायस्कूल मोरजी : २० पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे ९५ टक्के निकाल. पार्से हायस्कूल : २५ पैकी २३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९२ टक्के निकाल. सरकारी हायस्कूल दाडाचीवाडी-धारगळ : २१ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के. सरकारी हायस्कूल हणखणे : १३ पैकी १३ विद्यार्थी यशवंत झाल्यामुळे निकाल १०० टक्के.
विकास हायस्कूल विर्नोडा : १७ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के. सेंट जोसेफ हायस्कूल पेडणे : ४१ पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.५६ टक्के निकाल. अवर लेडी ऑफ रोझरी मांद्रे : एकूण ४० पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.५० टक्के निकाल. सेंट झेवियर विद्यालय कोरगाव : १५ पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे निकाल ९३.३३ टक्के. साई विद्यामंदिर तोरसे : २५ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के.
सेंट ॲनी हायस्कूल इब्रामपूर : ९ पैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के. ज्ञानदीप अकादमी कासारवर्णे : ८ पैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के. मांद्रे हायस्कूल : ६३ पैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९०.४८ टक्के. सरकारी हायस्कूल तोरसे : ४९ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९५ टक्के.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.