Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

Cylinder Blast: बांबोळी येथे गोवा रिअल इस्टेट प्रा. लि. कंपनीच्या बांधकाम परिसरातील मजुरांच्या पत्र्यांच्या झोपड्यांना काल सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली.
Cylinder Blast
Cylinder BlastDainik Gomantak

Cylinder Blast: मांगोर हिल - वास्को येथील गॅस सिलिंडर स्फोटची ताजी असतानाच बांबोळी येथे गोवा रिअल इस्टेट प्रा. लि. कंपनीच्या बांधकाम परिसरातील मजुरांच्या पत्र्यांच्या झोपड्यांना काल सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. १४० पैकी आग लागलेल्या १२ झोपड्यांमधील दोन गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाला, मात्र मोठे नुकसान झाले नाही.

आगीतील (Fire) दोन मोठे व एक लहान सिलिंडर्स काढण्यात आले. ही आग भडकल्याने मजुरांचे सुमारे ५० हजारांचे सामान खाक झाले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय वर्तवला जात आहे. ही आगीची दुर्घटना घडली तेव्हा झोपडीत कोणीही नव्हते. सर्व मजूर इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. या झोपड्या दाटीवाटीने असून सुदैवाने ही घटना रात्रीची न घडल्याने मोठी दुर्घटना टळली. काही महिन्यांपासून कंपनीचे नव्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे.

५० हजारांची हानी

या झोपड्यांमधून जाणारा रस्ताही अरुंद आहे. नेहमीप्रमाणे सर्व मजूर कामासाठी सकाळी ८ वा. बांधकामावर गेले होते. १२ झोपड्यांचे ५०हजारापर्यंत हानीचा अंदाज अधिकाऱ्याने व्यक्त केला, असे अग्निशमन दलाचे अधिकारी रुपेश सावंत यांनी दिली.

मडगावात चपलांचे दुकान भस्मसात

मडगावातील ओशिया कॉम्प्लेक्स इमारतीतील बुट्स या चपलांच्या दुकानाला आज पहाटे आग लागली व आतील सामान आगीत भस्मसात झाले. ही इमारत मडगावात मध्यवर्ती ठिकाणी असून या इमारतीत आयनॉक्स चित्रपटगृह आहे. शिवाय वाहतूक खाते, एसजीपीडीए सह इतर अनेक खाजगी कचेऱ्या व आजुबाजुला कित्येक दुकाने आहेत. मात्र ही आग पसरली नाही.

त्याचबरोबर अग्नीशमन दलाच्या जवानांनी लगेच घटनास्थळी येऊन आग विझवली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या दुकानाचे मालक विकास केदालकर यांनी सांगितले की, पहाटे ३.३० वाजता आम्हाला दुकानातून धूर येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही लगेच दुकानावर येऊन अग्नीशमन दलाला कळविले. त्यांनी लगेच येऊन आग विझवली. मात्र, नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अजून घेतला नसल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com