Pernem Road Issue: खड्डेमय रस्त्यांमुळे पेडण्यातील नागरिक त्रस्त, पेडणे विकास मंचचे 'साबांखा' विभागाला निवेदन; दुरुस्तीची मागणी

pernem road pothole issue 2026: पेडणे मतदारसंघातील विविध भागांतील नादुरुस्त आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पेडणे विकास मंचाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली.
Pernem Road Issue
Pernem Road IssueDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: पेडणे मतदारसंघातील विविध भागांतील नादुरुस्त आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पेडणे विकास मंचाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली. मंचचे अध्यक्ष डॉ. संजय कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक अभियंते शिवकुमार गावस यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी वझरीचे उपसरपंच अनिल शेट्ये, वारखंड-नागझर पंचायतीचे सदस्य वसंत नाईक, कासारवर्णेच्या माजी सरपंच तथा विद्यमान पंच अवनी गाड, हळर्णचे पंच मयूर परब, सामाजिक कार्यकर्ते नरेश कोरगावकर आणि उमेश तळवणेकर उपस्थित होते.

डॉ. संजय कोरगावकर यांनी पेडणे मतदारसंघातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे रस्ते धोकादायक ठरणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

Pernem Road Issue
Goa Noise Pollution: ध्वनिप्रदूषण नियमांची 'ऐशीतैशी', कारवाईत पक्षपातीपणा; किनारी भागातील स्थानिकांचा आरोप

उपस्थित प्रतिनिधींनी आपल्या गावांतील विविध रस्त्यांच्या समस्या अभियंते गावस यांच्यासमोर मांडल्या. उमेश तळवणेकर यांनी कोरगाव येथे बांधण्यात आलेल्या गटारावर लाद्या नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याचे सांगून त्वरित लाद्या बसविण्याची मागणी केली.

तर नरेश कोरगावकर यांनी पेडणे ते देवसू मार्गाच्या हॉटमिक्स कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी संपूर्ण रस्ता दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काम कोनाड नाक्यापर्यंतच करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर साहाय्यक अभियंते गावस यांनी संबंधित निविदा कोनाड नाक्यापर्यंतच काढल्याचे स्पष्ट केले.

देऊळवाडा-कोरगाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे मानशीवाडा ते भालखाजन मार्गाची दुर्दशा झाल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली.

Pernem Road Issue
Goa Congress: गिरीश चोडणकर पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खजिनदारपदी दत्ता दामोदर नायक यांची निवड

लवकरच डागडुजी!

सर्व समस्यांवर साहाय्यक अभियंते शिवकुमार गावस यांनी तळर्ण-हळर्णसह अन्य खड्डेमय रस्त्यांची डागडुजी लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच अनेक रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून पावसाळ्यानंतर संबंधित कामांना सुरवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com