Goa Corona Update: गोव्यामध्ये कोरोनाची लागण अत्यंत कमी असली; तरीही कोणताही धोका पत्करणार नाही- डॉ. राजेंद्र बोरकर

Goa Corona Update: गोव्यात सापडलेले नवे केसेस पूर्वीच्याच ओमिक्रॉन पद्धतीचे आहेत काय, त्याची तपासणी करण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवत आहोत.
Goa Corona Updates | Goa Covid 19 | covid-19 bf.7 variant | omicron bf 7 variant  | Dr. Rajendra Borkar
Goa Corona Updates | Goa Covid 19 | covid-19 bf.7 variant | omicron bf 7 variant | Dr. Rajendra BorkarDainik Gomantak

Goa Corona Update: जगभरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसत असले तरी भारतात विशेषतः गोव्यामध्ये कोरोनाची लागण अत्यंत कमी प्रमाणात आहे. तरीही आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. सध्या तरी जिनोमिक फ्रिक्वेन्सीवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती आरोग्य खात्याचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल ‘गोमन्तक’ला दिली.

बोरकर म्हणाले की, गोव्यामध्ये नव्या केसेस सापडल्या तर त्या पूर्वीच्याच ओमिक्रॉन पद्धतीच्या आहेत काय, याची तपासणी करण्यासाठी नमुने आम्ही म्हापसा येथील प्रयोगशाळेत, शिवाय पुण्यालाही पाठवत आहोत.

कोविडचा गोव्यातील व्हेरियंट ओमिक्रॉन असेल तर त्याचे प्रमाण कमी आहे. परंतु तो जर म्युटेड होत असेल, तर मात्र आम्हाला विशेष उपाय योजावे लागतील. विशेषतः विमानतळावर उतरणाऱ्या विदेशी पर्यटकांबाबत खबरदारी घेत आहोत. त्यांच्यामध्ये लागण आढळल्यास तो नमुना लागलीच प्रयोगशाळेत पाठविला जातो.

डॉ. बोरकर म्हणाले, सध्या आमच्याकडे प्रमाण अत्यल्प असले तरी भविष्यात काय होणार याबद्दल आम्हाला मात्र चिंता लागून राहिली आहे. सध्या लसीकरण पूर्ण थांबले आहे. आमच्याकडील लसींच्या साठ्याची कालमर्यादा 26 नोव्हेंबरपर्यंतच होती.

शेवटच्या लसीकरणात लसी घेण्यास लोक पुढे आले नाहीत. त्यामुळे आमचा साठा कालबाह्य झाला असता, म्हणून राहिलेला साठा ज्या राज्यांना आवश्‍यक आहे, तेथे पाठविला आहे. आम्ही या संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्त्वे तयार ठेवली आहेत. आरोग्य सुविधा त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग व इतर बाबींची पूर्तता करण्यात येत आहे, असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

Goa Corona Updates | Goa Covid 19 | covid-19 bf.7 variant | omicron bf 7 variant  | Dr. Rajendra Borkar
Goa Corona Updates: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील नियम शिथिल करण्याविषयी करावा लागणार फेरविचार?

मार्गदर्शक तत्त्वे तयार

शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांच्या आरोग्य खात्यासोबत आभासी पद्धतीने बैठक घेतली. त्यात राज्यांनी ताबडतोब लसी पाठविण्याची विनंती केंद्राला केली आहे. गोव्यामध्ये बुस्टर डोस घेण्याचीही विनंती दोन डोस घेतलेल्या लोकांना करणार असून, ज्यांनी बुस्टर घेतले आहे. त्यांना तो खूप फायदेशीर ठरेल, यात शंका नाही. राज्य सरकारने कोविडच्या उद्रेकासंदर्भात संपूर्ण व्यवस्थापन तयारीला लागले आहे.

डॉ. राजेंद्र बोरकर-

कोरोना उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर अजून आम्ही निर्धारित इस्पितळांबाबत निर्णय घेतलेला नाही. परंतु आवश्‍यकता भासली तर संपूर्ण सुसज्ज इस्पितळ या साथीसाठी वेगळे ठेवणे आम्हाला अशक्य नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com