Pernem
Pernem Dainik Gomantak

Pernem News : जीवन सुखकर करणे हे आपल्याच हातात : डॉ. तेजस कामत

Pernem News : कोरगावातील मोफत वैद्यकीय शिबिराचा १२७ रुग्णांना लाभ
Published on

Pernem News :

पेडणे, बदलत्या जीवनशैलीमुळे आज तरुणांनाही मधुमेह, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर आदी आजार ग्रासू लागले आहेत. कारण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आज बदललेल्या आहेत. शारीरिक श्रम कमी झाले आहेत.

मनावरचे ताण तणाव वाढले आहेत. त्याचबरोबर व्यसनाधीनता ही वाढली आहे अशा परिस्थितीत स्वतः काही नियम व मर्यादा पाळून आपले जीवन सुखकर करणे आपल्या हातात आहे, असे प्रतिपादन मधुमेह तज्ज्ञ डॉ. तेजस कामत यांनी केले.

कोरगाव येथील कमलेश्वर हायस्कूलच्या सभागृहात कृष्णाई विष्णू कोरगावकर फॅमिली असोसिएशन, श्री कमलेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघटना, श्री कमलेश्वर विद्यालय शिक्षण प्रसारक संस्था व इंडियन मेडिकल असोसिएशन बार्देश शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत वैद्यकीय शिबिरात डॉ. कामत बोलत होते.

Pernem
Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

व्यासपीठावर ज्येष्ठ सर्जन डॉ. महेश नाईक, आयएमआयएम बार्देश शाखेचे अध्यक्ष डॉ. वर्मा, सचिव डॉ. सिद्धेश नाईक, कमलेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सीताराम कोरगावकर, उपाध्यक्ष आत्माराम गावडे, कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन परशुराम गावडे, कृष्णाई विष्णू कोरगावकर फॅमिली असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कोरगावकर, कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्या जुही थळी व कमलेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक भालचंद्र हिरोजी आदी मान्यवर उपस्थित होते. समई प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ. महेश नाईक यांनी आपण जागृत राहूनआपले खाणे पिणे यावर लक्ष दिले दिले पाहिजे, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com