Goa: सत्तरीत पर्यायी व्यवस्था केली, ती ही धोकादायक

गोव्यात (Goa) वाळपई मतदारसंघातील (Valpoi Goa) गुळेली (Guleli) ग्रामपंचायत क्षेत्रात पैकूळ येथील रगाडा नदीवरील मिनी पूल (Bridge) वाहून गेल्यामुळे (Bridge) पैकूळवासीयांची बंधाऱ्यावरून जीव मुठीत घेऊन कसरत
Sattari Bridge in Goa
Sattari Bridge in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गुळेली : गोव्यात (Goa) वाळपई मतदारसंघातील (Valpoi Goa) गुळेली (Guleli) ग्रामपंचायत क्षेत्रात पैकूळ येथील रगाडा नदीवरील मिनी पूल (Bridge) पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे २३ जुलै रोजी वाहून गेला.

यामुळे पैकूळ (paikul) गावाचा अन्य भागांशी संपर्क तुटला होता. मात्र, वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था बोंडला (Bondla) मार्गे करण्यात आली आहे. पूल वाहून गेल्यामुळे ये-जा करण्यासाठी आणखी काही पर्याय नसल्याने जलस्रोत खात्याने पुलाजवळ असलेल्या बंधाऱ्यावर प्लेट टाकून सध्या लोकांना चालत जाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, ही पर्यायी व्यवस्था धोकादायक आहे. अरुंद लोखंडी प्लेटवरून चालताना कोणाचा तोल गेल्यास अनर्थ होण्याची शक्यता आहे.

Sattari Bridge in Goa
Goa Election 2022: भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी रिकार्डोची वरिष्ठाकडे मनधरणी

परंतु अन्य काही व्यवस्था नसल्याने याच पर्यायाचा वापर लोकांना नाईलाजास्तव करावा लागत आहे. या बंधाऱ्यावर (Small Bridge) ग्रामस्थांतर्फे पोफळीच्या झाडाचे बुंधे घालण्याचे काम सुरू होते. मात्र, आता त्यावर जलस्रोत खात्याने लोखंडी प्लेट घातल्याने त्यातल्या त्यात सोयीचे झाले आहे. येथील लोकांना वाहतुकीसाठी बोंडला मार्ग उपलब्ध आहे. पण हा रस्ता कच्चा असून त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे होत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी वा चारचाकी वाहने आहेत, तेच या मार्गाचा वापर करू‌ शकतात. त्यामुळे सध्या पैकूळवासीयांसाठी (Paikul) मार्गक्रमण करणे खडतर झाले आहे. यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी पर्याय योजावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Sattari Bridge in Goa
Goa: सालेलीतील युवकांनी श्रमदानाने केली रस्त्यांची साफ सफाई

बोरी येथे नवा पूल उभारण्याची गरज

दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा झुआरी नदीवरील (Goa) बोरीचा पूल (Zuari River) आता ३५ वर्षांचा झाला आहे. (Bori Goa Bridge) या पुलाचा पृष्ठभाग पावसामुळे उखडून खड्डेमय बनला आहे. ‘दै. गोमन्तक’ने यासंबंधी वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाने खड्ड्यांत दगड-धोंडे घालून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. या पुलाच्या जागी लवकरच पर्यायी पूल बांधणे आवश्‍यक आहे.

अन्यथा हा पूल कोणत्याही यावेळी ‘राम’ म्हणण्याची शक्यता आहे, असे बोरीतील जागरूक नागरिक विश्र्वंभर उर्फ बाप्पा देवारी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना म्हणाले. शासनाने पणजीत मांडवी नदीवर तीन पूल उभारले, कुठ्ठाळीत (Kotarlim) झुवारी नदीवर (Zuari River) दुसरा पूल उभारला जात आहे. पण बोरीच्या या पुलाला पर्यायी पूल बांधण्यासाठी अद्याप हालचाली झालेल्या दिसत नाहीत. यदाकदाचित या पुलाबाबत काही दुर्घटना झाल्यास दक्षिण आणि उत्तर गोव्याचा संपर्क तुटणार आहे आणि वाहतुकीचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. शासनाने या पुलाबाबत वेळकाढू धोरण न अवलंबिता या पुलाची वेळीच दुरुस्ती करावी आणि पर्यायी पूल बांधावा, अशी मागणी देवारी यांनी केली आहे.

बोरीचा पोर्तुगीजकालीन पूल (Zuari River) (Bridge) निकामी झाल्यावर त्याला पर्यायी पूल सुमारे तीन कोटी रुपये खर्चून बांधला. तो २७ ऑगस्ट १९८६ साली खुला केला. लगेचच निकामी झालेल्या या पुलाची दुरुस्ती पाच वर्षांपूर्वी ११ कोटी रुपये खर्चून केली. ही दुरुस्तीही व्यवस्थित न झाल्याने दोन वर्षांमागे बोरीचे सरपंच, उपसरपंच आणि पंचांनी आवाज उठवताच ठेकेदाराने ३० ऑक्टोबर २०१९ रोजी १० लाख रुपये खर्चून पुन्हा दुरस्ती केली.परंतु अलीकडच्या काळात या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वर्दळ पाहता हा पूल फारच कमकुवत बनला आहे.

सध्या या पुलाच्या पृष्ठभागाचा रस्ता पूर्णपणे धुपून गेला असून ठिकठिकाणी खड्डे पडून सिमेंट कॉंक्रिटमधील लोखंडी सापळा वर आलेला दिसतो. हा लोखंडी सापळा पावसाच्या पाण्याने गंजून निकामी होण्याची शक्यता आहे. कुठ्ठाळीचा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्यापासून उत्तर गोव्यातून येणारी तसेच बेळगाव, हुबळी, (Hubali) धारवाड, (Dharwad) कोल्हापूर, (Kolhapur) सांगली, मुंबई आदी भागातून वास्को, मडगाव, कारवार तसेच वेर्णा औद्योगिक वसाहतीत मालाची ने-आण करणारी वाहने तसेच वास्को बंदरातून इंधन घेऊन जाणारे टॅंकर तसेच अवजड माल घेऊन जाणारी वाहने याच पुलावरून जात असल्याने पुलावर ताण पडतो. काहीवेळा तर आठ ते दहा अवजड वाहने पुलावरून गेल्याने हा ३५ वर्षांचा पूल मोडून पडतो की काय, अशी भीती वाटते. वास्तविक पुलाचे आर्युमान केवळ ३० वर्षांचे असते. आणि या पुलाला तर ३५ वर्षे होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com