Goa Election 2022: भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी रिकार्डोची वरिष्ठाकडे मनधरणी

राजकीय तत्वांकडून सतवणूक झाल्यामुळे ब्रँड (Titto's Brand) विकावा लागला (Goa Election 2022)
Titto's Owner Ricardo De'Souza, Calangute. (Goa Election 2022)
Titto's Owner Ricardo De'Souza, Calangute. (Goa Election 2022)Santosh / Dainik Gomanatak
Published on
Updated on

येत्या विधानसभा निवडणुकीत कळंगुट मतदार संघातून (Calangute Constituency) स्थानिक आमदार मायकल लोबो (MLA Michel Lobo) यांच्या विरोधात भाजपच्याच तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी  कळंगुट मधील प्रसिद्ध टिटोज क्लबचे मालक (Titto's Club Owner) रिकार्डो डिसोझा (Ricardo De'Souza) यांनी पक्षाचे तिकीट कुठल्याही परिस्थितीत खेचून आणण्यासाठी चारीबाजूंनी मोर्चेबांधणी  केल्याचे व्रुत्त हाती लागले आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांनी नुकतीच दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ अधिकार्यांची (Meet BJP's Senior Leaders) भेट घेत त्यांचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरु आहे. दरम्यान, कळंगुट आणी पर्यायाने सबंध राज्याचा विकास सहजगतीने करण्याची नामी शक्कल आपल्याकडे असून केवळ वीज आणी पाणीच नव्हे तर कळंगुटवासियांना मोफत सदनिका देण्याचाही आपला बेत असल्याचा त्यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दावा केल्याचे समजते. (Goa Election 2022)

Titto's Owner Ricardo De'Souza, Calangute. (Goa Election 2022)
Goa: पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवी दिल्लीत COVID-19 चे प्रशिक्षण सुरु

दरम्यान, दिल्ली भेटीत भाजपच्या वरिष्ठांकडून आपल्याला योग्य वेळी योग्य सहकार्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीत आपली कळंगुट मतदार संघातूनच निवडणूक लढविण्याची इच्छा असून वरिष्ठांनी सुचविल्यास जवळपासच्या इतरत्र मतदार संघातून सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आपली तयारी असल्याचे रिकार्डो यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, आपली सतावणुक ही खुद्द सरकारकडून झालेली नसून सरकारातील कांही राजकीय तत्वांकडून झाली असल्याचे स्पष्ट करतांनाच ही सतावणुक गेल्या चाळीस वर्षापासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तथापि, त्याचाच परिणाम म्हणून आज आपण आपला कोट्यावधींचा व्यवसाय विक्रीस काढल्याचे त्यांनी सांगितले मात्र यापुढे आपल्या विरोधात कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा हिशोब चुकता करणे आता काळाची गरज बनली असून याबाबतीत प्रथम पाऊल उचलतांना कळंगुट मधून निवडणूक लढविण्याचा आपण निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोमंतकीय जनतेचा भुमीपुत्र या नात्याने नोकऱ्यांपासून इतर गोष्टीत गोव्यात प्रथम स्थान आणि संधी मिळाली पाहिजे, यांवर आपला अधिक भर राहाणार असल्याचे शेवटी रिकार्डो डिसोझा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com