Ola Uber नसल्याने लोक गोव्यावर हसतायेत, गुदिन्होंचे वक्तव्य; टॅक्सी व्यवसाय संपविण्याचा सरकारचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

Ola Uber In Goa: खाजगी सेवा आणल्याने गोव्याचे नाव खराब होईल आणि स्थानिक टॅक्सी मालकांचा व्यवसाय देखील हिरावून घेतला जाईल, चोडणकरांचे मत
Ola Uber | girish chodankar | Mauvin Godinho
Ola Uber | girish chodankar | Mauvin Godinho Dainik Gomantak
Published on
Updated on

Ola Uber In Goa

ओला आणि उबेर कंपन्यांना राज्यात निमंत्रित करून सरकार स्थानिक टॅक्सी व्यवसाय नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला. गोव्यातील भाजप सरकार ‘टोटल कमिशन’साठी ओळखले जाते असेही चोडणकर म्हणाले.

ओला आणि उबेरची सेवा नसल्यामुळे देशातील लोक गोव्यावर हसत आहेत या वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या विधानावर गिरीश चोडणकर यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात पुरेशा टॅक्सी असूनही ते खाजगी कंपन्या आणण्यास का इच्छुक आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील लोक अशा खाजगी सेवा पुरवणाऱ्यांवर खूश आहेत का, जिथे सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चिंताजनक राहिला आहे. याचा गुदिन्हो यांनी प्रथम अभ्यास केला पाहिजे.

गोव्यात, आमचे स्थानिक टॅक्सी मालक आणि मोटरसायकल पायलट आमच्या पर्यटकांशी आदराने आणि चांगल्या पद्धतीने वागण्यासाठी ओळखले जातात. खाजगी सेवा आणल्याने गोव्याचे नाव खराब होईल आणि स्थानिक टॅक्सी मालकांचा व्यवसाय देखील हिरावून घेतला जाईल, असे मत चोडणकर यांनी व्यक्त केले.

सरकारने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी टॅक्सी मालकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

Ola Uber | girish chodankar | Mauvin Godinho
Ribandar Road closure: मोठी आणि महत्वाची बातमी! दिवजा सर्कल ते ओल्ड गोवा मार्ग 50 दिवस राहणार बंद

“मी गुदिन्हो यांना आठवण करून देऊ इच्छितो की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या मे महिन्यात आश्वासन दिले होते की, ‘म्हजी बस’ योजना लागू केल्यानंतर राज्यात 24 तास बस सेवा उपलब्ध असेल, ज्यामुळे पर्यटक आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना मदत होईल.

आजपर्यंत ही सेवा का सुरू झाली नाही, असा सवाल चोडणकर यांनी केला.

भाजप सरकार दिलेली आश्वासने पाळण्यात अपयशी ठरले असून केवळ नको असलेले प्रकल्प आणि धोरणे राज्यातील जनतेवर लादत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.

गुदिन्हो यांनी कमिशनसाठी खाजगी कंपन्यांशी करार केला असावा आणि म्हणून ते स्थानिक टॅक्सी मालकांचा व्यवसाय समाप्त करण्यासाठी खूप उत्सुक आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com