Ribandar Road closure: मोठी आणि महत्वाची बातमी! दिवजा सर्कल ते ओल्ड गोवा मार्ग 50 दिवस राहणार बंद
Divja Circle To Old Goa Via Ribandar Road closure
पणजी स्मार्ट सिटीचे काम येत्या मुदतीपर्यंत पूर्ण करण्यासाठी सध्या सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत. रायबंदर भागातील कामाच्या पार्श्वभूमीवर ओल्ड गोवा ते दिवजा सर्कल हा मार्ग तब्बल 50 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करता येईल.
ओल्ड गोव्यातील बॅसिलिका बॉम जिझस ते दिवजा सर्कल पणजी हा संपूर्ण मार्ग 10 मार्च ते 30 एप्रिल या काळात स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त बंद ठेवला जाणार आहे. या काळात या मार्गावरील वाहतूक राष्ट्रीय महामार्ग 748 (कदंब बगलमार्ग) वर वळवली जाणार आहे.
प्रस्तावित प्रकल्पाचे काम सहा मार्चपासून चार टप्प्यात सुरु होणार आहे. या काळात भूमिगत नाला आणि गॅस लाईनचे काम केले जाणार आहे.
कामाच्या काळात मार्गावर आवश्यक बॅरिकेड, साईन बोर्ड, लाईट्सची व्यवस्था करावी अशी सूचना करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीचे काम येत्या 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासाठी शहरात स्मार्ट सिटीची कामे वेगात सुरु आहेत.
वाहतूक कोंडीची समस्या
दिवजा सर्कल, पणजी आणि रायबंदर भागात सकाळी ऑफिस वेळेत आणि सायंकाळच्या काळात वाहतूक कोंडी होत असते. दरम्यान, हा मार्ग बंद ठेवला जाणार असल्याने या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.