गोव्यातील इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे 'बजेट' कोलमडले

तेल कंपन्यांनी शुक्रवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ केली.
गोव्यातील इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे 'बजेट' कोलमडले
Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने गोवेकरांना घाम फुटला आहे. इंधन दरवाढीमुळे अनेक गोष्टी महागल्या आहेत. ही सातत्याने होणारी दरवाढ गृहिणींसाठी डोकेदुखी ठरत आहे. (people budget collapsed due to fuel price hike in Goa)

गोव्यातील इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे 'बजेट' कोलमडले
गोवा वीजघोटाळा प्रकरणी गुदिन्‍हो यांना दिलासा

गोव्यातील इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे घरचे बजेट कोलमडले आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ केली. या दरवाढीनंतर, गोव्यात पेट्रोल ₹102.98 प्रति लिटर, तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटरने विकले जात होते. गेल्या 10 दिवसांतील एकूण दरवाढ प्रति लिटर 6.40 पैसे इतकी आहे.

गोव्यातील इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे 'बजेट' कोलमडले
पिसुर्ले खनिज विक्रीप्रकरणी 80 कोटींचा आर्थिक घोटाळा

पाच राज्यांतील निवडणूक (Election) निकाल जाहीर होताच इंधनाचे दर वाढले आहेत. सरकार निवडणुकीदारम्यानच इंधन दर कमी करते का? असा प्रश्न लोक विचारात आहेत. कळंगुट येथील महिलेने आपली खंत व्यक्त केली. ती म्हणाली, दर वाढीमुळे घर चालवणे अवघड झाले आहे. रोजचा खर्च वाढला आहे आणि एलपीजीचे (LPG) दर देखील वाढले आहेत. यामुळे अतिरिक्त खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

दरम्यान, पणजी येथील एका रिक्षाचालकाने इंधनाचे दर वाढले असले तरी व्यवसाय कमी होत असल्याचे सांगितले आहे. इंधनाच्या वाढीमुळे अनेक मूलभूत गरजाही वाढल्या आहेत. भाजीपाल्याची किंमत वाढत आहे, तसेच इतर गरजाही वाढत आहेत. सरकारने (Government) या किमतींचा पुनर्विचार करून ते स्थिर केले पाहिजेत, असे लोकांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com