Fishermen Subsidy: 40 मच्छिमारांचा थकीत इंधन सवलतीचा निधी त्वरित द्यावा, फातर्पेकरांची मागणी; 2 वर्षांचे अनुदान बाकी

Tiswadi Fishermen: संजय फातर्पेकर म्हणाले, की मच्छीमार खात्याकडून काही ठराविक मच्छीमारांचेच २०२३ व २०२४ चे अनुदान देणे बाकी आहे.
Tiswadi Fishermen
Fishermen SubsidyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तिसवाडी तालुक्यातील एसटी समाजातील ४० मच्छिमारांचे २०२३ पासून थकीत इंधन सवलतीचा अनुदान निधी त्वरित द्यावा, अशी मागणी अखिल गोवा लघु मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी संजय फातर्पेकर यांनी केली. शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शैला डिमेलो, लक्ष्मण मंगेशकर व अन्य सदस्य उपस्थित होते.

संजय फातर्पेकर म्हणाले, की मच्छीमार खात्याकडून काही ठराविक मच्छीमारांचेच २०२३ व २०२४ चे अनुदान देणे बाकी आहे आणि त्यात आमचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विलंब आणि निष्क्रियतेमुळे अनुदान निधी केंद्र सरकारकडे परत करण्यात आला. खात्याच्या योजनेअंतर्गत मच्छीमार २०२३ मध्ये सुमारे १ कोटी रुपये मंजूर झाले होते.

राज्यभरातील विविध मच्छीमारांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, तिसवाडी तालुक्यातील आम्ही ४० जणांना योजनेचा निधी मिळालाच नाही, त्याशिवाय २०२४ चा निधी देखील मिळालेला नाही. याबाबत आम्ही खात्यातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी याबाबतची फाईल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असल्याचे सांगितले.

Tiswadi Fishermen
LED Fishing Ban: दंड नको बोट जप्त करा! एलईडी बोटींविरुद्ध मच्छीमार आक्रमक; कर्नाटकातील बेकायदा मासेमारीवर कारवाईची मागणी

राज्याच्या किनारपट्टीवरील अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकांना मासेमारी हाच एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. निधी का दिला गेला नाही, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, प्रलंबित अनुदान त्वरित जारी करावे याविषयी आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाकडून लेखी स्पष्टीकरण मागणारे निवेदन दिले असल्याचे संजय फातर्पेकर म्हणाले.

Tiswadi Fishermen
Goa Fishermen: गोमंतकीय मच्छीमारांना दिलासा, शुल्कात सवलत देण्यास CM सावंतांची सहमती

थकित पैसे देण्यात भेदभाव

यापूर्वी काही मच्छिमारांनी स्थानिक आमदारांना भेटून निधी मिळवला होता. मात्र, दर वेळेस आमच्या हक्काच्या निधीसाठी आमदार, मंत्र्यांकडे जाणे आम्हाला योग्य वाटत नसल्याने खात्याच्या संचालकांना त्याविषयी स्मरणपत्र पाठवल्याची माहिती देत फातर्पेकर म्हणाले, राज्य सरकार पद्धतशीरपणे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून, थकीत पैसे देण्याविषयी भेदभाव करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com