Dabolim Bogmalo: हजारो लिटर्स पाणी वाहून गेले, कंत्राटदाराला दंड करा; दाबोळी-बोगमाळे ग्रामस्थांची मागणी

Dabolim Bogmalo Water Pipeline: दाबोळी-बोगमाळो चौकात उड्डाण पुलाचे काम तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासंबंधी कंत्राटदाराने म्हणावी, तशी खबरदारी घेतली नाही.
Dabolim Bogmalo Water Pipeline
Dabolim Bogmalo Water PipelineDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी-बोगमाळो चौकात रस्ता रुंदीकरणाचे काम करताना फोडलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर्स पाणी वाहून गेल्याप्रकरणी कंत्राटदाराकडून पाणीपुरवठा खात्याने किती दंड आकारला आहे, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. अशा कंत्राटदारांकडून दंड वसूल केला पाहिजे, शिवाय पुन्हा असे कृत्य करणार नाही, यासाठी कठोर कारवाई करायला हवी, असे मत दाबोळी-बोगमाळे येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले.

बरेच पाणी वाया गेले, तरीही पाणीपुरवठा खाते संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्यास कचरत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी कायद्यानुसार दंड आकारण्याची गरज होती. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. वीज खात्याचे कार्यकारी अभियंते काशिनाथ शेट्ये यांचे उदाहरण घेऊन पाणीपुरवठा विभाग कारवाई करण्याची हिंमत दाखवतील काय? असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

दाबोळी-बोगमाळो चौकात उड्डाण पुलाचे काम तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासंबंधी कंत्राटदाराने म्हणावी, तशी खबरदारी घेतली नाही. त्यामुळे येथे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत, तर आसपासच्या आस्थापनांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथे काम करताना संबंधित सरकारी यंत्रणेला विश्र्वासात घेतले जात नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम करताना गेल्या दोन दिवसांत दोन ठिकाणी जेसीबीमुळे जलवाहिनीचे नुकसान झाले आहे.

Dabolim Bogmalo Water Pipeline
Dabolim Bogmalo: दाबोळी चौकातील व्यवस्थेत सुधारणा, मात्र नियम मोडण्याचे प्रकार सुरूच; शॉर्टकट मारण्याऱ्यांमुळे वाढतोय धोका

गुरुवारी (ता. १७) सकाळी जेसीबीमुळे तेथील जलवाहिनीचे नुकसान झाल्याने हजारो लिटर्स पाणी वाहून गेले. याप्रकरणी पाणीपुरवठा विभागाने कायद्यानुसार त्या हजारो लिटर्स पाण्याचे पैसे वसूल करण्याची गरज होती. तथापि अधिकारी त्या कंत्राटदारासमोर उभे राहण्यासही कचरत आहे. त्यामुळे दंड वसूल करण्याचे दूरच राहिले. तेच जर सर्वसामान्याकडून एखाद्या जलवाहिनीला नुकसान झाले असते, तर त्या व्यक्तचा पाणीपुरवठा बंद केला असताच शिवाय दंडही आकारला असता असे बोलले जात आहे.

Dabolim Bogmalo Water Pipeline
Dabolim: जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी! दाबोळीत बेजबाबदार कामाचा फटका; JCB चालकाला ठरवले दोषी

मीटर नसतानाही ‘बिल’

झुआरीनगर येथे एका व्यक्तीने घराची दुरुस्तीचे काम सुरू केले होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाला कुणकुण लागताच एका अभियंत्याने तेथे जाऊन त्या व्यक्तीचे पाणी पुरवठा बंद केलाच शिवाय मीटर्सही काढून नेला. दुरुस्तीसाठी तू नळाचे पाणी वापरतो आहे, ते नियमात बसत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्याला पुन्हा कनेक्शन पाहिजे असल्यास तू नवीन अर्ज कर, मीटरचे पैसे भर, इतर सोपस्कार कर, असे वगैरे सांगण्यात आले. आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा मीटर काढून नेला असतानाही त्याला महिन्याचे बिल पाठविण्यास पाणीपुरवठा विभाग विसरले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com