Dabolim: जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी! दाबोळीत बेजबाबदार कामाचा फटका; JCB चालकाला ठरवले दोषी

Dabolim Bogmalo Pipeline Burst: एमईएस कॉलेज चौक ते दाबोळी-बोगमाळो चौकादरम्यान उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे.
Dabolim Bogmalo Pipeline Damaged
Dabolim Bogmalo Pipeline BurstDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी-बोगमाळो चौकात गुरुवारी (ता.१७) सकाळी रस्ता रुंदीकरणासाठी जेसीबीने खोदकाम सुरू असताना तेथील जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. याप्रकरणी पाणीपुरवठा विभागाने कंत्राटदाराला व कंत्राटदाराने जेसीबी चालकाला जबाबदार धरले आहे.

मात्र, जलवाहिनी फुटल्याने रहिवाशांना काही काळ पाण्याविना राहावे लागले. त्यासाठी कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणा, दादागिरीमुळे एका वीज कामगाराला जीव गमवावा लागला होता. काहीजणांना लहानमोठ्या अपघातांना सामोरे जावे लागले होते. तेथील इंधनवाहिनीचे नुकसानही झाले होते. या घटनांतून हे अधिकारी किंवा कंत्राटदार कंपनी कोणतेही शहाणपण शिकत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

एमईएस कॉलेज चौक ते दाबोळी-बोगमाळो चौकादरम्यान उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे. दाबोळी-बोगमाळो चौकात कंत्राटदार कंपनीतर्फे रस्ता रुंदीकरणाचे काम सुररू आहे. त्यामुळे याठिकाणची जलवाहिनी मागे हटविण्यासाठी ७ व ८ एप्रिलला संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

गुरुवारी (ता.१७) सकाळी या चौकात रस्ता रुंदीकरणासाठी खोदकाम सुरू होते. यावेळी तेथील जलवाहिनीचे नुकसान होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याची गरज होती. त्या कामासंबंधी पाणीपुरवठा विभागाला विश्र्वासात घेऊन माहिती देण्याची गरज होती. मात्र, या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ‘जेसीबी’ने खोदकाम करताना तेथील जलवाहिनीखालील दगडांचा आधार निखळला गेल्याने तेथील जोड अलग झाल्याने जलवाहिनीतील पाणी वेगाने बाहेर पडू लागले. महामार्गावरून पाणी धो-धो वाहू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया गेले.

Dabolim Bogmalo Pipeline Damaged
Dabolim Airport: दाबोळी 'भूत बंगला' होणार; मोपामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटन संकटात

जेसीबी चालकाला दोष

जलवाहिनी फुटल्यानंतर तेथे आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने त्या कंत्राटदाराला काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही जलस्रोत विभागाला माहिती का दिली नाही, अशी विचारणा केली. मात्र, त्या कंत्राटदाराने जेसीबी चालकाला दोष देत आपली जबाबदारी झटकली. या घटेनेनंतर तेथील जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू झाले. मात्र, कंत्राटदारांना, कामगारांना कोणीतरी समज देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया येथे व्यक्त होत होत्या.

Dabolim Bogmalo Pipeline Damaged
Dabolim Bogmalo: दाबोळी-बोगमाळो चौकात वाहतुकीचे तीनतेरा, बॅरिकेड्स हटवल्याने वाढले अपघात; जुन्या नव्या फलकांमुळे संभ्रम

दुरुस्तीमुळे रहिवाशांत समाधान

चिखली-बोगमाळो चौकात जेसीबीमुळे फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती दुपारी करण्यात आली. ही दुरुस्ती पाणीपुरवठा विभागाने केली. त्यासाठी कंत्राटदारने कामगार दिले. फुटलेली जलवाहिनी ३०० मि.मी. व्यासाची असून दोन मोठ्या जलवाहिन्यांना ती जोडली आहे. त्यातून चिकोळणा, खोला भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. ही जलवाहिनी फुटल्याने काही काळ पाणीपुरवठा खंडित झाला होता. उन्हाळा त्यातच पाणीपुरवठा बंद झाल्याने रहिवाशांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, दुरुस्तीकाम झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com