बेतकी, खांडोळा, माशेलात शांततेत मतदान

सॅनिटायझर, ग्लोज, पिण्याच्या पाण्याची सोय बूथवर ठिकठिकाणी पाहायला मिळाली
Peaceful voting in Khandola
Peaceful voting in KhandolaDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा : प्रियोळ मतदारसंघातील माशेल, तिवरे, वरगाव, बेतकी, खांडोळ्यात (Khandola) शांततेत मतदान झाले. कुठेही खूप मोठी गर्दी जाणवली नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर ‘एसओपी’चे पालन करून मतदान करण्यात आले. सॅनिटायझर, ग्लोज, पिण्याच्या पाण्याची सोय होती. सकाळी जवळजवळ दीडेक तास एखादी व्यक्तीच मतदान केंद्रावर येताना दिसत होती.

Peaceful voting in Khandola
फातोर्डा मतदारसंघात जनतेचा काैल कोणाला?

मात्र 9:30 नंतर प्रत्येक केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. दुपारनंतर मतदारांनी काही प्रमाणात केंद्रावर गर्दी केली. ज्येष्ठ मतदारांना वाहनातून आणले जात होते. पोलिस (police) बंदोबस्त कडक असल्याने मतदान केंद्राच्या दोनशे मीटर लांब प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते उभे राहून आपल्या पक्षाला किती मते मिळतील, याचा अंदाज घेत होते. येणाऱ्या मतदारांचे स्वागत करीत होते, मतदानानंतर जाताना मतदारांना हात उंचावून आभार व्यक्त करीत होते. माशेल पंचक्रोशीत मतदानासाठी मतदारांत उत्साह दिसत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward Suspends Alliance Talks
Swiggy Rs 93 Lakh Theft
Jaigad Shipbuilding Project
Heavy Rain, Yellow Alert In Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com