Goa Election : हणजुण-कायसुव पंचायतीवर 25 वर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या आल्मेदांचा अस्त

पेट्रीक सावियो आल्मेदा यांचा लक्ष्मीकांत चिमुलकर या नवख्या उमेदवाराकडून दारुण पराभव करण्यात आला आहे.
Patrick Savio Almeida
Patrick Savio AlmeidaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Panchayat Election : हणजुण-कायसुव पंचायतीवर गेली 25 वर्षे निर्विवाद अधिराज्य गाजविणाऱ्या सावियो आल्मेदांचा अस्त झाला आहे. लक्ष्मीकांत चिमुलकर या तरुण उमेदवाराने पराभव केल्यामुळे अखेर 25 वर्षांनंतर आल्मेदांना सरपंचपदाची खुर्ची सोडावी लागणार आहे.

हणजुण-कायसुव पंचायतीवर गेली पंचवीस वर्षे सरपंच तसेच उप-सरपंच म्हणून अधिराज्य गाजविणाऱ्या पेट्रीक सावियो आल्मेदा यांचा (प्रभाग क्रमांक 8 ) लक्ष्मीकांत चिमुलकर या नवख्या उमेदवाराकडून दारुण पराभव करण्यात आला आहे. चार वेळचे हणजुण-कायसुव पंचायतीचे सरपंच पद उपभोगलेल्या माजी सरपंच सावियो आल्मेदा यांचा पराभव करून लक्ष्मीकांत चिमुलकर सध्या येथील जाइंट किलर ठरले आहेत.

Patrick Savio Almeida
Vishwajit Rane : आधुनिक गोव्याच्या उभारणीसाठी टीसीपी कायद्यात बदल

उर्वरित विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 1 दिनेश पाटील, प्रभाग क्रमांक 2 सुरेंद्र गोवेकर, प्रभाग क्रमांक 3 स्मिता खोर्जुवेकर, प्रभाग क्रमांक 4 अनुप मांदेकर, प्रभाग क्रमांक 5 प्रतिमा गोवेकर, प्रभाग क्रमांक 6 रुमाल्डीन मिनेझीस, प्रभाग क्रमांक 7 सुदेश पार्सेकर, प्रभाग क्रमांक 9 निकीता गोवेकर, प्रभाग क्रमांक 10अग्नेस कार्वाल्हो, आणि प्रभाग क्र 11 मधून शितल नाईक या विजयी झालेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Student Safety In Mapusa
Goa Online Financial Fraud
BNS Chargesheets Filed
42 Percent Cooperative Societies Closed
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com