Goa: 2 कोटीची दारू पकडली, उपनिरीक्षकाची तातडीने झाली बदली; शंकास्पद कारवाईमुळे चर्चेला उधाण

Patradevi liquor seizure: विधानसभा निवडणुकीच्या काळात चोरटी दारू पकडणाऱ्या अधिकाऱ्यांचा सरकारने गौरव केला होता. परंतु आता बदली कशी, असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे.
Patradevi liquor seizure transfer
Patradevi liquor seizure transferDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पत्रादेवी अबकारी चेकनाक्यावर चोरटी वाहतूक करणाऱ्या दारू प्रकरणांमध्ये अबकारी उपनिरीक्षक देऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली एक दारूचे वाहन पकडून त्यातील दोन कोटी ८८ लाख ९३ हजार रुपयांची दारू आणि अंदाजे २० लाख रुपयांचे वाहन जप्त केलेल्या अबकारी उपनिरीक्षक देऊ राऊत यांची तातडीने सरकारने बदली केली. त्यामुळे अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत.

चोरटी दारू वाहतूक होत असल्याने ती अबकारी अधिकाऱ्यांनी पकडली, त्‍यानंतर त्‍यांचे कौतुक होण्‍याऐवजी त्‍यांची बदली कशी होते, या संदर्भात शंका व्‍यक्त केल्‍या जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात चोरटी दारू पकडणाऱ्या अधिकाऱ्यांचा सरकारने गौरव केला होता. परंतु आता बदली कशी, असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे.

Patradevi liquor seizure transfer
Goa Crime News: सख्ख्या काकाने रक्ताच्या नात्याला काळिमा फासला; 2 अल्पवयीन मुलींवर केला लैंगिक अत्याचार

६ मे रोजी सायंकाळी उपनिरीक्षक देऊ राऊत यांनी अबकारी चेक-पोस्ट पत्रादेवी येथे इतर अबकारी अधिकाऱ्यांसमवेत एक वाहन (एचआर-५८-डी-०७५२) ताब्‍यात घेतले. तपासणीत मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूसाठा सापडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com