Baba Ramdev In Goa: गोव्यात उभारणार पतंजली 'वेलनेस केंद्र'! योगगुरु रामदेव बाबांची घोषणा; मोठ्या प्रमाणावर होणार रोजगारनिर्मिती

Baba Ramdev Goa Visit: हरिद्वारनंतर देशातील सर्वांत मोठे पतंजली वेलनेस केंद्र गोव्यात उभारण्यात येणार असल्याची माहिती योगगुरू बाबा रामदेव यांनी दिली.
Baba Ramdev Goa project
Baba Ramdev Goa projectDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हरिद्वारनंतर देशातील सर्वांत मोठे पतंजली वेलनेस केंद्र गोव्यात उभारण्यात येणार असल्याची माहिती योगगुरू बाबा रामदेव यांनी दिली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गोवा सरकारच्या सहकार्याने साकारण्यात येणार असून, राज्यातील आरोग्य आणि वेलनेस पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले की, प्रस्तावित वेलनेस केंद्रासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित थेरपिस्ट आणि डॉक्टरांची टीम उभारली जाणार आहे. त्यामुळे गोव्यातील आरोग्य व वेलनेस क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.

Baba Ramdev Goa project
Guru Pushya Yoga: पुष्य नक्षत्र आणि गजकेसरी राजयोगाचा महासंगम, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी 'या' चुका टाळा; वाचा पूर्ण माहिती

या प्रकल्पामुळे आयुर्वेद, योग, नैसर्गिक उपचार आणि वेलनेस सेवांना प्रोत्साहन मिळेल, तसेच देश-विदेशातील पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Baba Ramdev Goa project
बाबा रामदेव यांना कंपनी सुरु करण्यासाठी 40 हजार कोटींचं कर्ज, ब्रिटनमध्ये आयलँड गिफ्ट; कोण आहे हे जोडपे?

... तरच गोसंरक्षणाचा उद्देश साध्य

गोसंरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून ती कृतीतूनच पूर्ण होऊ शकते. गोसंरक्षणावर बोलणाऱ्यांनी केवळ चर्चा न करता स्वतः पुढाकार घेऊन आदर्श निर्माण केला पाहिजे. प्रत्येक हिंदूने किमान एक गाय पाळली तरच गोसंरक्षणाचा खरा उद्देश साध्य होईल, असे योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com