Mangalore Express: गोव्यात धावत्या ट्रेनमधून पडून प्रवाशाचा मृत्यू; अपघात की आत्महत्या?

Mangalore Express Train: मंगळुरु एक्सप्रेस ट्रेनमधून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (१८ फेब्रवारी) सकाळच्या सुमारास घडली आहे.
Mangalore Express
Mangalore ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

मये: मंगळुरु एक्सप्रेस ट्रेनमधून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (१८ फेब्रवारी) सकाळच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासानुसार, संबंधित व्यक्ती प्रवासादरम्यान ट्रेनमधून खाली पडली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेतील मृत व्यक्ती कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पोलीस स्थानिक रहिवाशांशी संपर्क साधून आणि इतर रेल्वे स्थानकांशी समन्वय साधून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mangalore Express
Goa Lottery: गोमंतकीयांसाठी खूशखबर! दररोज 15 लाख रुपये जिंकण्याची संधी; 3 कोटींची तिकिटे

अपघात की आत्महत्या

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासासाठी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळेल. दरम्यान, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

हा अपघात होता की आत्महत्येचा प्रकार, याचा तपास सध्या सुरू आहे. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपशीलवार तपास करत आहेत.

Mangalore Express
Chhatrapati Sambhaji Maharaj Goa War: छत्रपती संभाजी महाराज आणि गोवा, इतिहासातील महत्त्वपूर्ण संघर्ष

एक्सप्रेस ट्रेनमधून पडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांसमोर ही गंभीर समस्या निर्माण झाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने सुरक्षेबाबत अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com