Goa Farming: आफ्रिकी काजूंच्या निकृष्ट दर्जामुळे गोव्याची बदनामी

Goa Farming: रवी नाईक : काजू विक्रीमध्ये गैरप्रकार आढळल्यास ग्राहकांनी तक्रार करावी
Goa Farming
Goa FarmingDainik Gomantak

Goa Farming:

राज्यात आफ्रिकेतील काजू गोव्याचे काजू म्हणून विकले जातात. असे काजू ज्यावेळी पर्यटक खरेदी करून घेऊन जातात व ते खराब निघतात, त्यावेळी गोव्याची बदनामी होते. अशा प्रकारांवर कारवाई करणे गरजेचे असून जर असा प्रकार कोणी करत असेल तर ग्राहकांनी हा प्रकार ग्राहक मंच किंवा संबंधित खात्याच्या नजरेत आणून द्यावा.

जेणेकरून त्यावर कारवाई करता येईल, असे प्रतिपादन नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी केले. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याद्वारे संस्कृती भवन, पाटो येथे आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमात नाईक बोलत होते. यावेळी खात्याचे सचिव संजीत रॉड्रिग्स, संचालक जयंत तारी, को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे रजिस्ट्रार अरविंद बुगडे उपस्थित होते.

मंत्री नाईक म्हणाले, ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी सरकारला योग्य त्या सूचना करव्यात. अशा सूचनांचे स्वागत केले जाईल.

Goa Farming
Mopa Airport: ‘जीएमआर’कडून मोपावर कायमस्वरूपी नोकऱ्या नाहीच

जागृतीची गरज!

नागरी पुरवठा खाते हे नागरिक, ग्राहकांशी निगडित आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन तसेच त्या कशा कमी करता येतील यासाठी योग्य ते प्रयत्न करून शाळा, महाविद्यालयांत जागृती करणे गरजेचे असल्याचे सचिव संजीत रॉड्रिग्स यांनी सांगितले.

संचालक जयंत तारी म्हणाले की, अर्थकारणात ग्राहकांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांचे हक्क कळावेत, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी, ग्राहकांची फसवणूक झाल्यास कोणाकडे दाद मागवी, काय करावे हे त्यांना कळावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com