14 ऑगस्ट हा देशाचा विभाजन हुतात्मा स्मरण दिवस असून या दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली त्यांच्या बलिदानाचे स्मूर्तीसाठीचा दिवस हा आहे. या सर्व हूत्म्यांचे स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या मुकमोर्चाचे आयोजन केले होते.
( participation of Chief Minister Pramod Sawant in BJP's silent rally in Panaji )
मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्टला भारताचे भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. हे विभाजन होताना देशभर अनेक हुतात्म्याने आपल्या प्राणाची आहुती दिली. या दरम्यानच्या काळात सरहद्दीवर मोठी दंगल आणि प्राणहानी झाली. या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आजचा दिवस विभाजन हुतात्मा स्मरण दिवस म्हणून पाळला गेला.
यानिमित्ताने राज्य सरकारच्यावतीने पणजीच्या चर्च सर्कल इथून आझाद मैदानावर मूक रॅली काढण्यात आली. संध्याकाळी चर्च सर्कल पासून सुरू झालेली ही रॅली पणजीतून फिरून आझाद मैदानावर गेली. तिथे भारत माता की जय, वंदे मातरम च्या नाऱ्याने जयघोष करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, आमदार चंद्रकांत शेट्ये, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.