Parra: 'आमच्यावरील गुन्हे मागे घ्या'! भूमिका, साखळेश्वर देवस्थान वाद; पर्येतील शेकडो नागरिकांची पोलिस स्थानकावर धडक

Bhumika Sakhaleshwar Temple conflict: पर्येतील श्री भूमिका आणि साखळेश्वर देवस्थान यांच्या महाजनांमधील वाद प्रकरणात पोलिसांनी ३७ जणांवर गुन्हे दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
Parra temple dispute
Bhumika Sakhaleshwar conflictDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: पर्येतील श्री भूमिका आणि साखळेश्वर देवस्थान यांच्या महाजनांमधील वाद प्रकरणात पोलिसांनी ३७ जणांवर गुन्हे दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणावरील पहिली सुनावणी उद्या, २५ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे शेकडो लोकांनी गुरुवारी वाळपई पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन आमच्यावरील गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली.

यासंदर्भातील संबंधितांना समन्स बजावल्यानंतर गावामध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे शेकडो लोकांनी गुरुवारी संध्याकाळी वाळपई पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन आमच्यावरील गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला.

यावेळी पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर, प्रथमेश गावस व इतरांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निरर्थक ठरला. जोपर्यंत गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत पोलिस स्थानक सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस स्थानक परिसरात तणाव निर्माण झाला.

Parra temple dispute
Parra: पिसुर्ले, होंडा भागातील खाणी बंदच! नागरिकांमध्ये असंतोष; कंपन्यांची ‘स्वेच्छा निवृत्ती’ योजना अमान्‍य

आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

आमदार दिव्या राणे यांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत शुक्रवार, ता. २५ रोजी दुपारी १२ वाजता विधानसभा कक्षामध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.

Parra temple dispute
Bhumika Temple: भूमिका देवस्थानच्या वर्धापनदिनावरून वाद! तोडगा काढण्याचे प्रयत्न अपयशी; फक्त धार्मिक विधी होणार

भूमिका मंदिर वाद, गुन्हा केवळ ३७ जणांवरच का?

पत्रकारांशी बोलताना लोक म्हणाले, की ज्यावेळी देवस्थान परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी सुमारे ४ हजारहून जास्त नागरिक आणि भाविक त्या ठिकाणी उपस्थित होते. असे असताना ३७‌ जणांवरच गुन्हे का दाखल केले? हेतूपुरस्सर या भागातील नागरिक आणि भाविकांना डिवचण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com