Parra: पिसुर्ले, होंडा भागातील खाणी बंदच! नागरिकांमध्ये असंतोष; कंपन्यांची ‘स्वेच्छा निवृत्ती’ योजना अमान्‍य

Goa Mining: इतर भागांतील खाणी लिलाव करून सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु पिसुर्ले व होंडा परिसरातील खाणींचा लिलाव करण्याची कोणतीही हालचाल सरकार करत नसल्याने सहनशीलता आता संपली आहे.
Goa Mining
Parra MiningDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: गेल्या बारा-तेरा वर्षांपासून बंद पडलेला खाण व्यवसाय अद्याप सुरू झाला नसल्याने पर्ये मतदारसंघातील पिसुर्ले तसेच होंडा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. इतर भागांतील खाणी लिलाव करून सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु पिसुर्ले व होंडा परिसरातील खाणींचा लिलाव करण्याची कोणतीही हालचाल सरकार करत नसल्याने सहनशीलता आता संपली आहे.

त्यातच आतापर्यंत कामगारांना आधार दिलेल्या ‘वेदान्‍ता’ कंपनीने कामगारांना स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली असल्याने त्‍यात आणखी भर पडली आहे. सरकारने हस्तक्षेप करून वेदान्‍ता कंपनीने जाहीर केलेली स्वेच्छा निवृत्ती योजना मागे घेण्यास लावावी अशी मागणी कामगारवर्गाकडून करण्यात येत आहे.

२०१२ साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील खाण व्यवसाय बंद करण्यात आला. त्यामुळे पोर्तुगीज कालखंडापासून सुरू असलेल्या पिसुर्ले तसेच होंडा परिसरातील सर्व खाणी बंद झाल्‍या. त्यामुळे या भागातील खाण व्यवसायावर अवलंबून असलेले नागरिक तसेच कामगार संकटात सापडले.

Goa Mining
Shirgao Mining: 50 वर्षे जुन्या खाणखंदकापासून गावाला वाचवा, शिरगाववासीयांची मागणी; पावसात 'ओव्हरफ्लो' होण्याची भीती व्यक्त

सरकार कायदेशीर पद्धतीने खाणी सुरू करणार या आशेवर जगत होते. परंतु अद्याप सरकारकडून या परिसरातील खाणी सुरू करण्यासंबंधी कोणतीच दखल घेतली जात नाही, त्यामुळे कसेबसे संभाळून ठेवलेले ट्रक व इतर साहित्य पूर्णपणे गंजून जात आहे. यापुढे कवडीमोल भावही मिळणार नसल्‍याची चिंता त्‍यांना सतावत आहे.

Goa Mining
Pissurlem: सपाटो डोंगराच्या कुशीत उगम होणारा, पुढे हरवळ्यात उंच कड्यावरून झेपावत रुद्रेश्वरास अभिषेक घालणारा 'पिसुर्ल्याचा ओहोळ'

२०१८ पासून नुकसान भरपाई बंद

पिसुर्ले तसेच होंडा परिसरातील खाण व्यवसायामुळे या भागातील शेकडो शेतकऱ्यांच्‍या बागायती व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे त्या बदल्यात खाण कंपन्यांकडून सदर शेतकऱ्यांना वर्षांतून दोन वेळा नुकसान भरपाई दिली जात होती. पण २०१८ सालापासून एकाही कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे शेतजमीन नाही आणि भरपाईसुद्धा नाही अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.

वेदान्‍ता कंपनीने कामगारांना स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली असल्याने यापुढे या भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे. या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप करून ही योजना मागे घेण्यास कंपनीला भाग पाडावे आणि विनाविलंब या परिसरातील खाणीचा लिलाव करून खाणी सुरू कराव्यात.

देवानंद परब, सरपंच (पिसुर्ले)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com