युवकांनी केला रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रेरणादायी प्रयोग

' रेन वॉटर हार्वेस्टिंग' चा प्रकल्प सफल करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचे हे प्रयत्न आणि विचार प्रेरणादायी ठरत आहे.
Parra : रावण कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी खोदलेले खड्डे
Parra : रावण कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी खोदलेले खड्डेदशरथ मोरजकर
Published on
Updated on

पर्ये: सत्तरीतील रावण कॉलनी- केळावडे हा अंजुणे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गेलेला केळावडे गावचा पुनर्वसीत गाव. गेल्या काही वर्षांपासून भेंडी उत्पादनामुळे हा गाव नावारूपास आला आहे. इथली जुनी पिढी कष्टकरी आहे तसेच नवीन पिढीही शेतीवर लक्ष देणारी व शेती करण्यास आतुरलेले आहे. गेल्या सहा वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी जंगली प्राण्यांच्या हैदोसावर आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले होते. यावेळी तर इथल्या काही युवकांनी आपल्या शेत जमिनीचा पुरेपूर उपयोग करून जास्तीत जास्त पीक घेण्याचा निश्चय केला असून शेतीला पाणी मिळण्यासाठी ' रेन वॉटर हार्वेस्टिंग' चा प्रकल्प सफल करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचे हे प्रयत्न आणि विचार प्रेरणादायी ठरत आहे.

Parra : रावण कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी खोदलेले खड्डे
किशोरवयीन मुलींनो जरा सांभाळून!

गोव्यातील बहुतेक शेतकरी एका जमिनीत दोन पिके घेत असतात. पण एकाच जमिनीत वर्षाला तीन पिके घेण्याचे प्रयोग देशात विविध ठिकाणी घेतले जात आहेत. वर्षाला तीन पिके घेणे किंवा जमिनीचा 12 महिनेही पुरेपूर उपयोग केल्यास जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते. अशा परिस्थितीत रावण कॉलनी - केळावडेतील शेतकऱ्यांना आपल्या शेतात तिसरे पीक घेण्याची उत्सुकता आहे. पण यासाठी येथे पाण्याचा मुबलक पुरवठा उपलब्ध नाही. येथे अंजुणे धरणाचे पाणी डिसेंबर पर्यत येते. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर असे 3 महिने इथल्या शेतजमिनी पाण्याअभावी कोरड्या पडतात आणि या तीन महिन्यात तिसरे अल्प पिके घेण्याची यांची संधी हुकते. तेव्हा ही पाण्याची समस्या सोडवण्यासाठी इथल्या युवकांनी पावसाळी पाणी इथल्या मातीत जिरवण्याचे ( 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' ) कार्य आरंभलेले आहे व त्यांच्या या प्रकल्पाला आता चांगली सफलता मिळत असल्याचे दिसून येते.

Parra : रावण कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी खोदलेले खड्डे
गोव्यातील महिला सांगताहेत धोरण कसे असावे..!
दशरथ मोरजकर : रावण कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी खोदलेले खड्डे
दशरथ मोरजकर : रावण कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी खोदलेले खड्डेदशरथ मोरजकर

गेल्या वर्षी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ने जिरवले 51 लाख लिटर पाणी

गावातील जमिनीची पाण्याची पातळी वाढणे आणि इथल्या बोरवेल विहिरींना पाणी उपलब्ध होण्यासाठी त्यांनी हा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवला आहे. या गावात तीन बोरवेल होत्या. धरण पुनर्वसित गाव असल्याने सरकारने त्यावेळी त्या खोदल्या होत्या पण कालांतराने त्या बंद पडल्या. यापैकी एक बंद स्थितीत असलेली 'बोरवेल' या 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' साठी त्यांनी वापरली आहे. गेल्या वर्षांपासून त्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली असून गावातील मंदिराशेजारी असलेल्या या बोरवेलच्या भागात हा प्रकल्प राबवत आहे.

या प्रकल्पासाठी त्यांनी बोरवेल दिशेने वाहून येणाऱ्या सुमारे 1000 चौरस मीटर जागेतील पाणी हे खड्डे खोदून अडवण्यात येते . यासाठी त्यांनी या भागात सुमारे एक फूट विरुद्ध 3 फूट असे दहा खड्डे खोदले आहे आणि बोरवेलच्या सभोवताली दोन चर खोदले आहे व त्यात नदीतील वाळू व छोटे दगड टाकले आहे. मे 2020 मध्ये त्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केल्यावर गेल्या वर्षी त्यांनी 1020 चौ मी जागेतील सुमारे 51 लाख 50 हजार लिटरपाणी यशस्वीपणे जिरवले आहे. या पावसाळ्यात त्यांनी सुमारे 52 लाख लिटर पाणी जिरवले असल्याचे त्यांनी सांगितले.

Parra : रावण कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी खोदलेले खड्डे
गरबा नृत्यातून संस्कृतीचे जतन: सरपंच वैशाली शेटगावकर

तिसऱ्या पिकासाठी बोरवेलचे पाणी

यांना एकदा की बोरवेलचे मिळायला सुरुवात झाली की त्याचा वापर शेतातील तिसरे पीक घेण्यासाठी उपयोग करणार असे त्यांचे म्हणणे आहे. सद्य गावात ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात शेतीसाठी पाण्याची टंचाई असते. ही टंचाई बोरवेलचे पाणी भागवेल. सद्य त्यांनी बोरवेल भागात जिरवलेल्या पाण्याचा वापर 10000 चौ मी ( अडीच एकर) भागातील शेतीसाठी वापरता येईल. असे त्यांचे मत आहे. त्यामुळे या तीन महिन्यात लाल भाजी, मुळा सारख्या भाज्या पिके घेतली जाऊ शकेल तसेच या तीन महिन्यांत माड-पोफळीना पाणी उपलब्ध होईल असे मत संस्थेचा प्रमुख विनय गावस यांनी सांगितले.

सद्य घेतली जातात दोन पिके

सद्य या भागात शेतकरी वर्ग पावसाळी व उन्हाळी अशी दोन पिके घेतात. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर पर्यंत दोडगी, काकडी, चुबुड, वाल तर जानेवारी ते मे महिन्याच्या काळात प्रामुख्याने भेंडीचे पिके घेतली जातात. 2020 मध्ये येथील शेतकऱ्यांनी 17 मेट्रिक टन तर 2021 मध्ये सुमारे 25 मेट्रिक टन भेंडी राज्य फलोत्पादन संस्थेला घातली होती. दरम्यान त्यांना हे पाणी उपलब्ध झाल्यास ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात तिसरे पीक घेता येईल असे त्यांचे मत आहे.

Parra : रावण कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी खोदलेले खड्डे
तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती माघार घेण्याच्या निर्णयाचे स्वागत...

सांघिक कामातून साकारतोय प्रकल्प

दरम्यान केळावडे 'रेन वॉटर हार्वेस्टिंग संघ' अशी संस्था स्थापन करून त्यांनी हे काम आरंभलेले आहे. या संस्थेत 20 सदस्य असून 8 जणांची कार्यकारी समिती आहे. आणि समितीत गावातील विविध क्षेत्रातील व्यक्ती ना प्रतिनिधित्व दिलेले आहे. त्यांचे हे कार्य सांघिकरित्या चालते व कष्टाची कामे श्रमदानातून केली जातात.

सरकारच्या मदतीची गरज

दरम्यान या युवकांतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाला जलसंधारण खात्याची तांत्रिक मदत झाली आहे व त्यांच्या वीज आणि संसाधन संस्थेचे अधिकारी संतोष गाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पण त्यांना बोरवेल कार्यान्वित करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी त्यांना बोरवेलची स्वच्छता, बोरवेलचे पाणी खेचण्यासाठी पंप व त्यांना सौरऊर्जाची ऊर्जा व ती जवळच्या शेतापर्यंत नेण्यासाठी वाहिनी अशी कामे करायची आहे. यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. तेव्हा सरकारने ही मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रकल्प राबवण्यासाठी युवकांचा पुढाकार

हा प्रकल्प राबवण्यासाठी येथील विनय गावस यांची मूळ संकल्पना आहे. यांच्या संघाचे अध्यक्ष विनय गावस आहे. त्यांना गावातील महेंद्रनाथ गावस, साईश पिकूळकर आदी इतर युवकांची साथ लाभत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com