Garba
GarbaDainik Gomantak

गरबा नृत्यातून संस्कृतीचे जतन: सरपंच वैशाली शेटगावकर

भारतात वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या लोककला आहेत
Published on

मोरजी: भारतातील वेगवेगळ्या राज्यातील ज्या काही लोककला आहेत त्या आत्मसात करणे आणि योग्य ते प्रशिक्षण घेवून कलेला उंच शिखरावर पोहचविणे प्रत्यक भारतीयाचे काम आहे. सध्या गुजराती लोकनृत्याला जास्त पसंती दिली जात आहे. कारण भारतात नवरात्रीमध्ये सगळीकडे गरबा नृत्य केले जाते.

Garba
Goa: नवरात्रोत्सव निमित्त '101 सामूहिक सत्यनारायण' पूजा संकल्प संपन्न

गोव्यातही गरबा नृत्य मोठ्या प्रमाणात केले जाते. गरबा नृत्यातून व इतर कलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन करावे असे आवाहन सरपंच वैशाली शेटगावकर यांनी मोरजी येथिल श्री कळस देव मांगर येथे केले. श्री देव सत्पुरुष महिला मंडळ तर्फे गरबा आणि नृत्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर सरपंच सौ. शेटगावकर बोलत होत्या.

यावेळी प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका मानसी म्हामल, स्नेहा तिळोजी श्रुती केरकर, श्रेया फडते आदी उपस्थित होते. एकूण 40 युवती व महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. महिलांनी केवळ घरात राहून कार्य करून चालणार नाही. सर्व कला आत्मसात करत असतानाच शरीराला व्यायाम दिला तर आरोग्य तंदुरुस्त राहू शकते असे सांगून महिला आणि युवतीला या मंडळा मार्फत सर्व प्रकारच्या कलेचे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने दिले जाणार असल्याचे यावेळी सरपंच वैशाली शेटगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com