School
SchoolDainik Gomantak

Parra News : केरी-धनगरवाड्यातील शाळेची व्यथा ; विजेची सोय नसल्याने वर्गांच्या स्थलांतरास उशीर

दुरुस्तीवेळी वर्गांसाठी पर्यायी व्यवस्था केलेल्या अपुऱ्या जागेत बसून मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे मुलांची मोठी गैरसोय होत आहे.
Published on

Parra News : पर्ये, केरी-सत्तरीतील, धनगरवाडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाचे दुरुस्ती काम पूर्ण होऊन ३ महिने उलटले तरी विद्यालयात विजेची सोय न झाल्याने विद्यालयात वर्ग सुरू केलेले नाहीत.

दुरुस्तीवेळी वर्गांसाठी पर्यायी व्यवस्था केलेल्या अपुऱ्या जागेत बसून मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे मुलांची मोठी गैरसोय होत आहे.

शाळेचे दुरुस्तीकाम सुरू केल्यावर विद्यालयाचे वर्ग येथील जवळच असलेल्या ओम ब्रह्म सिद्ध आश्रमाच्या व्हरांड्यात सुरू केले होते.

गेल्या शैक्षणिक वर्षातील मार्च-एप्रिल आणि यंदा जूनपासून अजून ६ महिने मुले तिथे शिक्षण घेत आहेत. या विद्यालयासाठी अतिरिक्त खोली आणि दुरुस्तीच्या कामाला मार्च २०२३ मध्ये सुरवात झाली होती.

उन्हाळी सुट्टीत दुरुस्ती काम पूर्ण करून जूनमध्ये शाळांचे वर्ग नवीन दुरुस्त केलेल्या इमारतीत सुरू होणार, असे आश्वासन पालकांना देण्यात आले होते.

पण वीज उपकरणांच्या जोडणीचे काम रखडल्याने हे वर्ग स्थलांतरित झालेच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अपुऱ्या जागेत आणि गैरसोयीच्या ठिकाणी बसून शिकण्याची वेळ ओढवली आहे.

School
Goa Building Construction: व्‍हिलांचा ताबा देण्यास टाळाटाळ

वीज उपकरणांसंबंधी प्रस्ताव तसाच पडून

वर्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले तेव्हा वीज उपकरणे जोडणीचा स्वतंत्र प्रस्ताव सरकारला पाठवला होता. पण तो अजूनही मंजूर न झाल्याने हे काम सुरू झाले नाही.

यासंबंधी अधिक चौकशी केली असता या प्रस्तावाची निविदा मंजूर झाली आहे; पण प्रत्यक्षात काम सुरू करायला मंजुरी न दिल्याने हे काम रेंगाळले आहे. तेव्हा या कामाला त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी पालकवर्ग करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com