IFFI Divyangjan Section : इफ्फीच्या 'दिव्यांगजन’ विभागात ‘द स्टोरीटेलर’चा प्रीमियर; दृकश्राव्य पद्धतीचे सादरीकरण

IFFI 2022 Divyangjan Section : सर्वसमावेशकतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.
The Storyteller Movie Premier in IFFI 2022 Divyangjan Section
The Storyteller Movie Premier in IFFI 2022 Divyangjan SectionDainik Gomantak
Published on
Updated on

IFFI Divyangjan Section : इफ्फी हे कलाकारांसाठी आणि सिनेरसिकांसाठी महत्वाचे व्यासपीठ आहे. चित्रपटाविषयी प्रेम असलेल्या सर्वांसाठीच हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येतो. दिव्यांग व्यक्तींना देखील चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी तसेच सर्वसमावेशकतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. (The Storyteller Movie Premier in IFFI 2022 Divyangjan Section)

The Storyteller Movie Premier in IFFI 2022 Divyangjan Section
Goa IFFI 53rd: सावरकरांच्या बायोपिकसाठी रणदीप हुडाचा Weight Loss; इफ्फीत केला खुलासा

महोत्सवाच्या  ‘दिव्यांगजन’ विभागात अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटाचा प्रीमियर सादर करण्यात आला. यासाठी आवाजाच्या सहाय्याने कथेचे वर्णन आणि अनेक भाषांमधील वाचनीय संवाद यांचा समावेश असलेल्या दृकश्राव्य पद्धतीच्या विशेष सादरीकरणाची मदत घेण्यात आली.

एनएफडीसीचे महासंचालक म्हणाले की, वेगळ्या शैलीतील चित्रपटांसह नव्या उपक्रमांची सुरुवात केल्यामुळे यावर्षीचा इफ्फी महोत्सव अद्वितीय ठरला आहे. हा चित्रपट महोत्सव सर्वांना आनंद घेण्याजोग्या पद्धतीने आयोजित करावा अशी विशेष सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे. समाजातील सर्व घटकांना चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला पाहिजे. (Goa 53rd IFFI Latest Updates)

गोव्यातील राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव तहा हझिक हे देखील यावेळी उपस्थित होते. एनएफडीसी आणि इफ्फी यांनी दिव्यांग व्यक्तींकरिता दोन चित्रपटांचे सादरीकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हझिक यांनी कौतुक केले.

यावर्षी दिव्यांग व्यक्तींसाठी निर्माण केलेला विशेष विभाग म्हणजे इफ्फीच्या आयोजकांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला चित्रपट पाहण्यासाठी समाविष्ट करून घेण्याच्या आणि प्रत्येकाला चित्रपट उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल आहे. या विभागात चित्रपट प्रदर्शन आणि त्या ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधा तसेच व्यवस्थापन यांच्या स्वरूपाच्या बाबतीत दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या विशेष व्यवस्था लक्षात घेऊन प्रेक्षकांसाठी समर्पित सादरीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com